October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरेगावात विज वितरणाच्या कर्मचा-यास दांडक्याने ठोकण्याची धमकी,एकावर गुन्हा दाखल

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

घरात येवु नका. घराच्या बाहेर व्हा. शुटिंग काढु नका. शुटिंग काढली तर दांडक्याने मारीन. हिला झपकवुन काढा असे म्हणुन विज वितरण कंपनीच्या कर्मचा-यास व अधिका-यास म्हणुन शिविगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे घडला.

Advertisement

#प्रभाकर उर्फ बाळु उत्तम ढाकणे पाटील रा.कोरेगाव ता बार्शी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

@वर्षा धनाजी सोनवणे, वय-44वर्षे, कनिष्ठ अभियंता शाखा कार्यालय आगळगाव, रा.पाटील प्लॉट, शिवाजीनगर बार्शी, यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की विज थकबाकी  वसुली सुरू आहे.

सकाळी 09.00 वा.चे सुमारास त्या व  सह कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ आर.पी.जाधवर, एम.आर.कांबळे, तंत्रज्ञ पी.ए.पाटील, आर.आर.वाघेला, विद्युत सहाय्यक एस.व्ही.आहेर असे  कोरेगाव ता बार्शी येथे जावुन विजबील थकबाकी वसुली करणेकरिता तसेच मिटर चेकिंग करिता गेले होते.  सर्वजण गावातील ब-याच विजबील थकबाकी लोकांना भेटुन त्यांना थकबाकी बाबत विचारणा केली असता त्यावेळी काही लोकानी विजबिल भरणेकामी पैसे जमा केले व काहींनी विजबील भरणेकरिता मुदतवाढ मागितली. त्यानंतर  12.00वा.चे सुमारास  कोरेगाव येथील बसस्टपच्या पुढील भुम रस्त्याचे कडेला असलेल्या पोलवर थ्रीपेज कनेक्शन दिसल्याने सदरचे कनेक्शन आम्हाला संशयास्पद वाटल्याने  सदर पोलच्या शेजारील घरामध्ये जावुन पाहणी केली त्यावेळी तेथे कनेक्शन अगर मीटर दिसुन न आलेने घराचे बाजुचे पत्राशेडमध्ये गेलो त्यावेळी तेथे पिठाची चक्कीला आकडा टाकुन विजवापर करित असल्याचे दिसले. त्यावेळी तेथे दोन इसम आले व त्यातील एक इसम  म्हणाला की घरात येवु नका. घराच्या बाहेर व्हा. शुटिंग काढु नका. शुटिंग काढली तर दांडक्याने मारीन. हिला झपकवुन काढा असे म्हणुन शिविगाळ करुन आमचे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे मला तेथील विजचोरीचा लोड व आकड्यासाठी वापरलेली वायर काढु दिली नाही.  बरोबर आलेले सर्व स्टाफला पण शिवीगाळ करुन दांडक्याने मारीन अशी दमदाटी केली.  शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

Leave a Reply