June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरफळे ता.बार्शी येथे पंचेवीस हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

कोरफळे ता.बार्शी येथे पंचेवीस हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुका पोलिस ठाणे हद्दीतील कोरफळे येथे करण्यात आलेला अवैध देशी दारूचा साठा बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकून जप्त केला. कोरफळे येथे धाड टाकून सुमारे पंचेवीस हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कोरफळे तालुका बार्शी येथे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी देशी दारूचा अवैधरित्या साठा करण्यात आला असल्याची माहिती मिळालेवरून पोलीस नाईक संदेश पवार, महेश माने, बाळकृष्ण मुठाळ, मुजावर आदींनी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोरफळे येथील शोभाताई नगर येथील सिमेंट रोडलगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये दारूचा साठा असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाले वरून छापा टाकला असता तेथे बॉक्स आढळून आले त्यामध्ये टॅगो आणि ढोकी संत्रा कंपनीचे बॉक्स मिळून आले, ही एकूण पंचेविस हजार रुपयांची दारु जप्त करून पत्र्याचे शेड बाबतीत माहिती घेतली असता सदर शेड व दारू ही गावातील आण्णासाहेब विठ्ठल माने याचे असल्याचे सांगितले. याबाबत संदेश पवार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदेश पवार, महेश माने, बाळकृष्ण मुठाळ, मुजावर या पोलीसपथकाने केली.

Leave a Reply