October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरफळेच्या सरपंचपदी सविता शिंदे तर उपसरपंचपदी मुद्रुका संसारे यांची  निवड

बार्शी ;
कोरफळे येथे  सरपंच उपसरपंच पदाची निवड झाली असुन सरपंचपदी सविता तानाजी शिंदे, तर उपसरपंचपदी मुद्रुका रामभाऊ संसारे यांची एकमताने निवड करण्यात आली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनाजी बरडे, सागर भोसले, रोशन आतार, रेखा(ताई)लोखंडे या सर्वांनी श्री येमाई देवी ग्रामविकास आघाडी कोरफळे या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या सत्तास्थापणामुळे कोरफळे ग्रामपंचायतीवर सोपल गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक 2021 च्या झालेल्या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील कोरफळे या गावाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते, की नेमकं  सरपंच पदाचा मान कोणत्या गटाला मिळणार. जानेवारी मध्ये सरपंच पदाची सोडत बार्शी तहसील कार्यालयात झाली परंतु काही तांत्रिक व न्यायालयीन आदेशानुसार ती पुढे ढकलण्यात आली होती, ती निवड प्रक्रिया आज पार पडली.

कोरफळे येथे सरपंच उपसरपंच पदाची निवड झाल्या नंतर गावातील नागरिकांनी जल्लोष साजरा करत सरपंच सविता तानाजी शिंदे, उपसरपंच मुद्रुका रामभाऊ संसारे यांचेसह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनाजी बरडे, सागर भोसले, रोशन आतार, रेखाताई लोखंडे यांचा सत्कार केला. या यशाचे शिल्पकार सतीश इंगळे, बापू दुबळे, राजाभाऊ पाटील, इसाअण्णा तिकीटे, विठ्ठलअप्पा भोसले.  तसेच  मिटू सर, नेताजी बरडे, शंकर पाटील, रामभाऊ संसारे, राजाभाऊ नलवडे, नागजी वांगदरे, सुधाकर बरडे, शंकर बरडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी रामभाऊ कबाडे, गणेश सोनवणे, किशोर कांबळे, ॲड. सुहास कांबळे, गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply