कुसळंब टोलनाक्याजवळ दोघांवर चाकु हल्ला,अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल

#सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
उस तोड मजुर घेऊन कोल्हापूर कडे जाताना उस तोड मजुरानी दोघांवर चाकु हल्ला करून सोबत येण्यास नकार दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कुसळंब ता.बार्शी येथील टोलनाक्याजवळ घडला.याप्रकरणी दोघा अनोळखी ईसमाविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#युवराज सदाशिव किल्लेदार वय 47 वर्षे रा.निगवी खालसा ता. करवीर, जि.कोल्हापुर यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री ता. कागल जि. कोल्हापुर या कारखाण्यास करार करून टॅक्टर नं MH-13 AJ 0332 व टॅक्टर नं MH -09/FB/6117 हे दोन्ही टॅक्टर ऊस वाहतुकिसाठी दिलेले होते . सदर टॅक्टरचे ऊसतोडी करिता कामगार पुरविण्याचे काम मुकदम सलिम बाबु शेख रा. राहुरी (बुद्रुक) ता. जि. हिंगोली यास दिलेले होते.
ते ट्रक नं. MH-22/N/2889 मध्ये वरिल दोन्ही टॅक्टर मधील ऊसतोडी कामगार लोणार जि. बुलढाणा येथुन 11 पुरूष व 09 महिला ऊस तोड कामगार असे ते स्वता: व पंडित संभाजी खंदारे रा.तळणी ता.शेणगाव जि. हिंगोली मधुन कोल्हापुरकडे निघाले. ट्रक पहाटे 03.30 वा.चे सुमारास कुसळंब टोलनाकाच्या पुढे 03 किमी अंतरावर बार्शी च्या दिशेने आली असता. ट्रकमधील ऊसतोड कामगारांना लघु शंका लागल्याने ट्रकमधील ऊसतोड कामगारांनी ट्रक थांबविण्यास सांगितले म्हणून ट्रकचालकाने ट्रक थांबविली व ट्रकमधील ऊसतोड कामगार खाली उतरले. व ते पळुन जाऊ लागले तेव्हा फिर्यादी व त्यांचा जोडीदार पंडित संभाजी खंदारे रा.तळणी ता.शेणगाव जि. हिंगोली ट्रकमधील ऊसतोड कामगाराना पळुन जाऊ नका आम्ही तुमच्या मुकादमाला पैसे दिलेले आहेत. असे सांगत असताना जा आम्हाला तु कोणाला पैसे दिले आहेत ते माहीत नाही. आम्ही तुझ्या बरोबर येणार नाहीत. तुला काय करायचे ते कर असे म्हणून त्यापैकी दोन अनोळखी इसमांनी रागाचे भरात त्यांच्या हातातील चाकुने डावे हाताचे मनगाटाच्या वरिल बाजुन मारून मला जखमी केले. त्यावेळी माझा जोडीदार पंडित संभाजी खंदारे हा त्यांना मारू नका असे म्हणून मधे भांडने सोडविण्या करिता आला असता. त्याच दोन अनोळखी इसमांनी हाताने, लाथाबुक्याने त्याला मारहान करून शिविगाळ, दमदाटी केली व त्याचे ऊजव्या हाताचे अंगठ्या जवळ चाकु मारून त्यास ही जखमी केले.बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.