March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कुसळंबच्या सरपंचपदी शिवाजी खोडवे


बार्शी ;
  बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवाजी खोडवे  तर उपसरपंच पदी केशव काशिद यांची निवड झाली.
सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी वेगवेगळे दोन असे चार अर्ज दोन्ही गटाकडून दाखल झाले होते.निवडणूक निर्णय अधिका-यांनी हात उंचावून मतदान घेतले.यामध्ये खोडवे यांना पाच मते तर विरोधी गटास  चार मते पडली.निवडणूक निर्णय अधिकारी दासु राठोड यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली.
यावेळी नुतन सरपंच शिवाजी खोडवे,उपसरपंच केशव काशिद, अशोक झोंबाडे,अजित ननवरे,दिपाली काशिद, अनिता रोहित शिंदे, आश्विनी पवार,सीना शिंदे,सुजाता पोटरे, विनोद पवार,सुहास काशिद,कृष्णा काशिद,गणेश काळे,राहुल खोडवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply