March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभ  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सन २०१९-२० वर्षातील श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीची विद्यार्थिनी प्रतीक्षा गव्हाणे हिने बी.एस्सी रसायनशास्त्रात विद्यापीठात प्रथम व संपूर्ण बी.एस्सीत प्रथम क्रमांक प्राप्त करीत  सुवर्णकामगिरी केली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ऑनलाईन उपस्थीतीत दोन सुवर्णपदक विजेती प्रतीक्षा गव्हाणे हिचा सन्मान कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचें हस्ते संपन्न झाला.

  #यावेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ.बि.वाय.यादव यांना जीवनगौरव पुरस्काराने तर उत्कृष्ट शिक्षक म्हणून शिक्षण शास्त्रचे डॉ पांडुरंग शिखरे यांना गौरविण्यात आले.श्रेणीक शहा,आ.सुभाष देशमुख,प्राचार्य सुग्रीव गोरे ,प्रभाकर गव्हाणे आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात,प्रा.डॉ. टी.एन.लोखंडे आदींचे मार्गदर्शन मिळाले.श्री.नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिसाळ व्ही. बी,सचिवा मातोश्री एस एन.गडसिंग,खजिनदार ज्ञानदेव आगलावे,संचालक एल. वाय.पाटील,सहसचिव हेमंत गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक विलास मिरगणे,प्राचार्य विकास बोराडे,सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रभाकर गव्हाणे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply