June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कुंभारी येथे सेवापूर्ती झालेल्या जवान सहाने यांचा सत्कार……..

भोकरदन ; (सद्दाम बेग मिर्झा

Advertisement
)
  कुंभारी ता.भोकरदन येथील सैनिक आनंदा रामराव सहाने हे 22 वर्ष आंतरराष्ट्रीय सिमेवर पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मध्ये विशेषतः जम्मू काश्मीर येथे देशसेवा करूण आज शनिवारी सेवा निवृत्त झाले.
  सैनिक सहाने हे गावात आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने व वारकरी संप्रदायाच्या वतीने ह.भ.प.संतोष महाराज आढवणे पाटील,ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर ,यांनी त्यांनी केलेला देशसेवेबद्दल कृतज्ञता म्हणुन त्यांंची गावातुन सवाद्य मिरवणुक काढून, फटाक्याची आतषबाजी व पुषपगुच्छ देऊन यथोचीत सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी देशातील विविध ठिकाणी सेवा  देऊन केलेल्या देशसेवेच्या महान कार्याबद्दल उपस्थीतांनी त्यांंच्या कार्याला उजाळा दिला.
या सत्कारसमारंंभाला गावातील नागरीकांसह अबालवृदांची उपस्थीती होती. यावेळी भाऊसाहेब पाटील, अनिल पाटील सहाने, मधुकर फुके, अशोक सहाने, सूर्यकांत पाटील, कृष्णा मुरकुटे, इसरार पठाण, इद्रिस मिर्झा यांच्या सह ग्रामस्थ व मित्रमंडळी उपस्थित होते.


Leave a Reply