कासारवाडी येथे कोरोना ग्रामस्तरीय बैठक

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज
कासारवाडी ता.बार्शी येथील कोरोना ग्रामस्तरीय आढावा बैठक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे बार्शी तालुका गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आढावा बैठकीसाठी कासारवाडीच्या सरपंच सौ.अश्विनी मंडलिक,उपसरपंच सुधीर गायकवाड,ग्रामपंचायत सदस्या अंजना यमगर ,ग्रामसेवक राहुल गरड ,आरोग्य सेविका श्रीमती कल्पना डोळे , आशा वर्कर पुष्पा गुंड , वैशाली गायकवाड ,कासारवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर बडे, राजीव कांदे , बसनगौडर सर, रेणुका मुंढे , द्वारका पिंपळे , बार्शी पंचायत समितीचे विषयतज्ञ दत्तात्रय क्षिरसागर ,कोरफळे केंद्र प्रमुख महादेव शिंदे उपस्थित होते.
यावेळी श्रीमती साधनाताई काकडे यांनी गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आढावा घेतला.ग्रामस्तरीय पथकातील सदस्यांनी कोरोना ट्रेसिंग करणे,लसीकरणासाठी लोकांना प्रबोधन करणे,मास्क वापरणे,सॅनिटायजरचा वापर व नियमित हात धुणे,सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यास सांगितले.
ग्रामसेवक राहुल गरड यांनी गावातील कोरोना सध्यस्थिती,ट्रेसिंग करणे,लसीकरण याबाबत आढावा सादर केला.
कोरोना ग्रामस्तरीय बैठकीचे सूत्रसंचालन श्रीमती द्वारका पिंपळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजीव कांदे यांनी केले.
याकामी मुख्याध्यापक श्री सुधाकर बडे ,श्री बसनगौडर ,श्रीमती मुंढे यांनी उत्तम नियोजन केले होते.