October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कासारवाडीच्या सरपंचपदी आश्विनी मंडलिक तर उपसरपंचपदी जितेंद्र गायकवाड बिनविरोध


बार्शी ;
कासारवाडी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाच्या आश्विनी नितिन मंडलिक तर उपसरपंच पदीही राऊत गटाचेच जितेंद्र विश्वनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार श्री.पवार व ग्रामविकास अधिकारी राहुल गरड यांनी सरपंच, उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
  यावेळी नुतन सरपंच उपसरपंचासह  अंकुश मंडलिक, सुधीर शिंदे,वैशाली म्हस्के,महादेवी मंडलिक, रतन कदम,अंजना यमगर व विनोद थोरात हे नुतन ग्रामपंचायत सदस्य व आबासाहेब मंडलिक, शिवाजी पाटील,अशोक मंडलिक, नानासाहेब पाटील,रमाकांत पाटील,अशोक गायकवाड,धनाजी मंडलिक, सचिन मंडलिक,नितीन मंडलिक आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन सरपंच व उपसरपंच यांचा मान्यवरांकडून यथोचीत सत्कार करण्यात आला.पेढे वाटुन व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Reply