March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कालिदास मंडळाच्या अध्यक्षपदी रामचंद्र इकारे,उपाध्यक्ष पदी जयसिंग रजपूत तर सचिवपदी ढवण

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

बाबार्शी येथिल कवी कालिदास मंडळाच्या अध्यक्षपदी रामचंद्र इकारे तर उपाध्यक्षपदी जयसिंग रजपूत यांची निवड करण्यात आली. मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा डॉ रविराज फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी चन्नबसवेश्वर ढवण यांची निवड करण्यात आली. बार्शीत साहित्य संस्कृती जतन करण्याचे काम कवी कालिदास मंडळ गेल्या 29 वर्षांपासून करत आहे .कालिदास दिनाचे औचित्य साधून कालिदास महोत्सवात नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी मंडळाच्या वतीने ‘मेघदूत’ पुरस्कार देण्यात येतो. आजपर्यंत कवी उत्तम लोकरे, माधव पवार,मारुती कटकधोंड,गीतेश शिंदे,अविनाश बनसोडे,विनायक येवले,प्रशांत असनारे,अनुजा जोशी,मनोज बोरगावकर अशा अनेक कवींना सन्मानित करण्यात आले आहे .राज्यातील नामांकित साहित्यिकांची मांदियाळी कवी कालिदास मंडळाच्या व्यासपीठावर असते .
नूतन पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नूतन अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी ज्येष्ठ साहित्यिकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात विविध साहित्यिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले .यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश गव्हाणे,दत्ता गोसावी, शब्बीर मुलाणी,मुकुंदराज कुलकर्णी, सुमन चंद्रशेखर, डॉ कृष्णा मस्तुद ,प्रा अशोक वाघमारे तसेच सदस्य गंगाधर अहिरे,आबासाहेब घावटे,सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply