March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कार पंम्चर झाल्यामुळे थांबलेल्या कुटुंबाला मारहाण करूण लुटले, पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

बारामती : कार पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या कुटुंबाला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर ३ च्या हद्दीत घडली .पोलिसांनी संशयितांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.भिगवण पोलीस स्टेशन तर्फे देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

घटनेच्या त्यादिवशी रात्री ९.३० चे सुमारास फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह पुणे येथे निघाले होते.यावेळी त्यांची कार पंक्चर झाली. पंक्चर काढण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर 3 या गावच्या हद्दीत महामार्ग लगत ते थांबले होते. दरम्यान दोन संशयित व्यक्ती व त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी तीन लोकांसह तिथे आले. त्यांनी या कुटुंबाला मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले. भिगवण पोलिस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचे सोबतचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. आपण संशयितांना ओळखत असाल तर भिगवण पोलीस स्टेशनचे खालील नंबरवर संपर्क करून माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले .संशयितांबाबत सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने -९८३४५५३३००, पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख – ८६०५०५७७८८ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply