October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कारीत मारहाण ,गुन्हे दाखल

पांगरी; महाराष्ट्र स्पीड न्यूज

शेतातील डिपीचे पैसै भरण्याच्या कारणावरून भावकीतील लोकात भांडणे होऊन तिघे जखमी झाले. परस्परविरोधी फिर्यादीवरूण दोन्ही गटातील पाच जनावर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

#लक्ष्मी दत्तात्रय घाडगे , वय 55 वर्षे, रा कारी , ता-,जि -उस्मानाबाद दुपारी 12/00 वा चे सुमारास फिर्यादी शेतात जाणेसाठी घरासमोर उभे असताना  घराशेजारी राहणारे बबन तात्या घाडगे हे शिवीगाळी करू लागले म्हणुन त्यांना तुम्ही शिवीगाळी का करता असे म्हणाले असता ते म्हणाले कि, तुमची मुले आंम्हाला मोटार चालु करू देत नाहीत तेंव्हा बबन घाडगे यांना म्हणाले कि तुम्ही डीपीचे तुमच्या वाटणीचे पैसे दया व चालु करा असे फिर्यादी म्हणाल्या असता तो  म्हणाला कि, मी पैसे देत नसतो असे म्हणुन शिवीगाळी करत असताना तेवढ्यात मुलगा महेश घाडगे हा तेथे आला व बबन घाडगे यांना म्हणाला कि तुमचे वाटणीचे पैसे द्या व मोटार चालु करा असे म्हणत असताना बबन घाडगे याची सुन ज्योती  घाडगे ही तेथे पळत आली.तसेच शिवीगाळी करू लागली तेंव्हा फिर्यादी तीचेकडे हात करून तु मध्ये बोलु नको असे म्हणत असताना तीने  उजवे हाताचे मधले बोटाला माझा उजवा हात हातात धरून चावली व माझी केस ओढुन मला मारहाण केली आहे.

##विरोधी ज्योती शिवाजी घाडगे , वय 35 वर्षे,  रा कारी , ता-,जि -उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या गंभीरे यांचे शेतात मिरच्या तोडणीचे काम करत असताना त्यांचा मुलगा व मुलगी हे तेथे पळत आले व  म्हणाले कि, आपले आजोबा बरोबर ती लक्ष्मी आजी भांडण करत आहे.त्या घरी गेल्या असता तेथे महेश  घाडगे ,लक्ष्मी  घाडगे ,अश्विनी  घाडगे हे तेथे हजर होते व  सासरे बबन घाडगे यांचेसोबत भांडण करत होते.
फिर्यादी लक्ष्मी  घाडगे यांना म्हणाल्या कि काय झाले आहे तुम्ही भांडण का करता. तेव्हा महेश  घाडगे याने शिवीगाळी करून  अंगावर धावुन येवुन  चापट मारून खाली पाडले व माझे सासरे यांचेच हातातील काठी घेवुन  पाठीत मारली तेंव्हा अश्वीनी घाडगे व लक्ष्मी घाडगे यांनी मला शिवीगाळी व दमदाटी करून हाताने लाथा बुक्याने  मारहाण करत असताना माझे सासरे बबन घाडगे हे मध्ये मला सोडवणेस आले असता त्यांनाही मारहाण केली.
पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply