June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कारीतील  श्री.शिवाजी विद्यालय व शरद पवार महाविद्यालय मोफत N95 मास्क वाटप

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज
  कारी ता.जि.उस्मानाबाद येथील श्री शिवाजी विद्यालयात शारिणी फौंडेशनच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षकवृंद व कर्मचारी यांना मोफत N-95 मास्कचे वाटप करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविर  भुसारे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शरिणी संस्थेचे पदाधिकारी इब्राहिम काझी,दादासाहेब गायकवाड, परीक्षितराजे विधाते, संभाजी बनसोडे,मंगेश शिंदे,आम्रपाली पाटील आणि चंद्रकांत करळे हे उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू व covid-19 रोगविषयी जागृती निर्माण करण्यात आली व त्याबद्द्ल खबरदारी पाळणे,मास्क चा वापर करण्यास सांगण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाविषयी सांगण्यात आले.

Leave a Reply