कापसी(सावरगाव)येथे मारहाण

बार्शी;
शेतातील ज्वारी का उपटत आहात व आमच्या शेतात ट्रॅक्टर फा फिरवत आहात असे विचारल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळुन दोघांना मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कापसी (सावरगाव) येथील शिवारात घडला.
#वलीबा बोराडे ,आगतराव बोराडे , मोहन बोराडे व राहुल बोराडे रा कापसी (सावरगाव ) ता बार्शी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
#मकरचंद रामहारी सुरवसे वय 48वर्षे, रा कापसी (सावरगाव ) ता बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.त्यांच्या शेता शेजारीच वलीबा बोराडे यांची शेती आहे. सकाळी 11/30वा. सुमारास ते व त्यांचा पुतण्या प्रदिप रविंद्र सुरवसे असे दोघेजन जणावरांना पाणी दाखवण्या करीता शेतातील जाणावरांच्या कोट्याकडे गेले होते. व मुलगा रामराजे हा बोअर चालु करण्याकरीता गेला होता. तो बोअर चालु करून परत येत असताना त्यांच्या शेती गट नंबर 123 मध्ये असलेले ज्वारीचे पीकामध्ये शेता शेजारी असलेले वलीबा बोराडे, आगतराव बोराडे, मोहन बोराडे, राहुल बोराडे हे शेतातील ज्वारीचे पीक उपटुन बांधावर टाकत असताना दिसले म्हणुन मुलगा रामराजे हा फिर्यादीकडे पळत आला व त्याने वरील प्रकार सागितला. त्यानंतर फिर्यादी व पुतण्या प्रदिप असे सदर ठिकाणी जावुन त्यांना आमची ज्वारी तुम्ही का उपटता असे विचारले असता तेथे हजर असणारे वलीबा सदाशिव बोराडे, आगतराव सदाशिव बोराडे, मोहन सदाशिव बोराडे, हे त्यांना म्हणाले की, येथुन आमची जाण्या येण्याची वाट आहे. आम्ही येथुन वाट करणार आहोत तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणुन त्यांच्या शेतातुन ट्रँक्टर फिरवुन शिवीगाळी करून आगतराव बोराडे याने त्याचे हातात काठी घेवुन अंगावर धावुन येवुन उजवे हातावर मारली तेव्हा मोहन सदाशिव बोराडे हा पण अंगावर धावुन येवुन डावे हाताचे कोपराला चावु लागला तेव्हा फिर्यादीचा पुतण्या प्रदिप सुरवसे हा सोडवण्यास आला असता त्याला पण मोहन बोराडे हा चावला असुन वलीबा सदाशिव बोराडे, राहुल वलीबा बोराडे हे दोघेजन शिवीगाळी करून मला माझ्या पुतण्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली.
याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत