March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील कांदलगावात चाकु हल्ला

सोलापूर ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

तु आमचे घरामध्ये मी दारू पितो असे सांगुन भांडन लावतो काय तुला लई मस्ती आली काय असे म्हणुन एकास शिविगाळी करून  चाकुने  वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथे घडला.
#धनाजी महादेव शिरसट रा. कांदलगाव ता. बार्शी असे चाकु हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

#जखमी मच्छिंद्र विश्वनाथ मुकटे वय-36वर्षे , रा.कांदलगाव ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या घराचे जवळच धनाजी महादेव सिरसट व संतोष महादेव सिरसट हे राहणेस असुन त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. दुपारी 04/.00वा.चे सुमारास ते घरी असताना धनाजी  सिरसट हा त्यांच्याकडे येवुन तु माझे वडीलांना मी दारू पितो असे का सांगितले म्हणून  भांडू लागला. त्यावेळी फिर्यादीने त्याला चल तुझ्या वडीलांकडे असे म्हणून ते व धनाजी असे दोघेजन त्याचे शेतामध्ये वडीलांकडे गेलो असता मी त्यांचे वडील महादेव सिरसट यांवा धनाजी दारू पितो असे केंव्हा सांगितले असे विचारले असता त्यांनी मी तुझे नाव सांगितले नाही असे सांगितले.  तेव्हा धनाजी याने फिर्यादीला शिविगाळी करून हाताने मारहान केली.
  त्यानंतर दि.28/03/2021रोजी सांयकाळी 07.00वा.चे सुमारास  गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रोडवर चौकात थांबलो असताना धनाजी महादेव सिरसट हा त्यांच्याकडे येवु लागला त्यावेळी त्याचे उजव्या हातामध्ये चाकु होता तो  जवळ येवुन तु आमचे घरामध्ये मी दारू पितो असे सांगुन भांडन लावतो काय तुला लई मस्ती आली काय असे म्हणुन शिविगाळी करून त्याच्या उजव्या हातामध्ये असलेल्या चाकुने माझे डाव्या बाजुस काखेमध्ये वार केला.
जखमीवर बार्शीत उपचार सुरू आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply