कळंब शाखेत अपहार,मॅनेजरसह सेल्समन वर बार्शीत गुन्हा

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
वारंवार कळवुनही अपहार केलेली रक्कम न भरल्याप्रकरणी कळंब जि.उस्मानाबाद येथील के.टी.ट्रॅक्टर्स कंळब शाखेचे ब्रँन्च मॅनेजर व सेल्समन अशा दोघांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#मॅनेजर प्रशांत भिमराव कांबळे रा.आबेंडकर चौक मुरूड ता.जि.लातुर व सेल्समन आकाश काळे रा नायगांव रोड मुरूड ता.जि.लातुर अशी अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
#विनोद आत्माराम कांबळे वय.45 वर्षे धंदा. असिस्टंट मनेजर, रा. कासारवाडी रोड बार्शी हे के.टी.ट्रक्टर्स मुख्य कार्यालय लातुर रोड, बार्शी येथे अस्टिंट मॅनेजर या पदावर काम करून आपला व कुंटुबाचा उदरनिर्वाह करतात.
के.टी.ट्रॅक्टर्स कंळब शाखा जि उस्मानाबाद येथे नोव्हेबंर 2020 अखेरपर्यत ब्रँन्च मनेजर म्हणुन प्रशांत भिमराव कांबळे रा.आबेंडकर चौक मुरूड ता.जि.लातुर व सेल्समन म्हणुन आकाश काळे रा नायगांव रोड मुरूड ता.जि.लातुर हे काम पाहत होते.दरम्यान ते के.टी.ट्रक्टर्स कंळब शाखा येथे ट्रॅक्टर बुंकीग करून ग्राहकाला सोबत घेवुन त्याचेकडील रक्कम हि बार्शी येथे मुख्य ऑफिसला भरून घेवुन त्याना पावती देत असतात.त्यानंतर ग्राहकाचे मागणीप्रमाणे ट्रॅक्टर व इतर साहित्य त्याना पुरविले जात होते.
के.टी.ट्रॅक्टर्स कंळब शाखा येथुन सुधीर व्यकंटराव घोगरे रा.ऐकुरका ता कंळब जि उस्मानाबाद यानी दि.20/09/2019 रोजी कंळब शाखेचे मॅनेजर प्रशांत भिमराव कांबळे व सेल्समन आकाश काळे याचेमार्फतीने 8,000 रू रोख रक्कम डाउनपेमंटचा भरणा बार्शी मुख्य कार्यालयामध्ये करून कुबोटा मॉडेल नं 5501 हा ट्रॅक्टर बुंकीग केला होता.त्यांनतर बँकेकडून कर्जप्रकरण करून सुधीर व्यकंटराव घोगरे यांना ट्रॅक्टर्स देण्यात आला होता. तसेच डाउनपेंमेटची उर्वरीत येणेबाकी 20,000 /-रू रक्कम हि पुढील काळामध्ये भरणा करून घेणेची हमी कंळब शाखेचे मॅनेजर व सेल्समन यानी घेतली होती.
त्यांनतर डिसेंबर 2020 पर्यत सुधीर व्यकंटराव घोगरे रा.ऐकुरका ता कंळब जि उस्मानाबाद याचेकडुन डाउनपेमंटचे उर्वरीत 20,000/-रू.चा भरणा के.टी.ट्रॅक्टर्स मुख्य कार्यालय लातुर रोड बार्शी येथे न झालेने दि.02/12/2020 रोजी मुख्य कार्यालयाचे वसुली अधिकारी नितीन जोशी व अंकाऊट क्लार्क सागर राऊत हे दोघेजण सुधीर घोगरे याचेकडे गेले असता तेथे त्याना माहीती मिळाली कि, सुधीर घोगरे यांनी डाउनपेमंटचे उर्वरीत 20,000 /- रू रोख रक्कम हि कंळब शाखेचे मॅनेजर प्रशांत भिमराव कांबळे व सेल्समन आकाश काळे याना मुख्य कार्यालयात जमा करणेसाठी दिली होती.व त्या दोघानी त्याना पावती क्रं 14182 प्रमाणे दि.28/10/2020 रोजी रक्कम भरणा केलेबाबतची पावती दिली आहे अशी माहीती मिळाली होती. यावेळी वसुली अधिकारी नितीन जोशी यानी व्यवहाराची खात्री करणेसाठी मागणी केलेप्रमाणे सुधीर व्यकंटराव घोगरे यानी पावती क्रं 14182 हि आमचे कार्यालयाकडे जमा केली होती. त्यानंतर वसुली अधिकारी नितीन जोशी व अंकाऊट क्लार्क सागर राऊत यानी मुख्य कार्यालयात येवुन खात्री केली असता प्रंशात कांबळे व आकाश काळे यानी सुधीर व्यकंटराव घोगरे रा.ऐकुरका ता कंळब जि उस्मानाबाद याचेकडुन डाउनपेमंटचे उर्वरीत 20,000/-रू रक्कम घेतली असुन सदरची रक्कम हि मुख्य कार्यालात जमा न करता दि.28/10/2020 रोजी हेतुपरस्पर पावती पुस्तकामधुन पावती क्रं 14182 प्रमाणे पावती तयार करून त्याची दुययम प्रत जाणीवपुर्वक हिशोबासाठी रेकर्डवर न ठेवता आमचे परस्पर पावती सुधीर व्यकंटराव घोगरे याना देवुन 20,000/- रूचा अपहार केल्याचे समजले.त्यानंतर सदरचा घडला प्रकार मालक संतोष रावसाहेब ठोंबरे रा. पाटील प्लॉट बार्शी यांना सांगितली .
त्यानंतर कळंब शाखेचे मॅनेजर प्रशांत भिमराव कांबळे व सेल्समन आकाश काळे याना सदरची रक्कम जमा करणेबाबत वेळोवेळी कळवुनही त्यानी अपहार केलेली रक्कम हि भरणा केली नाही.तसेच त्याना याबाबत पाठपुरावा केला असता त्यानी मुख्य कार्यालयाचे अंकाऊट क्लार्क सागर राऊत, उस्मानाबाद जिल्हा मनेजर भारत दत्तात्रय सलगर या कर्मचा-याना फोनवरून दमदाटी करून शिवीगाळी केली आहे.