June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कळंबवाडी शिक्षक खुन प्रकरण- बापलेकांना  आठ दिवसांची पोलिस कोठडी

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

कळंबवाडीच्या सेवानिवृत्त शिक्षकाचा अज्ञात कारणावरूण रस्त्यात अडवुन खुन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बाप लेकांना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

#बिभिषण विश्वनाथ उमाप व विश्वनाथ बाबु  उमाप दोघेही रा.कळंबवाडी अशी आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलेल्या बाप लेकांची नावे आहेत.

#याबाबत अधिक माहिती अशी की काल दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी कळंबवाडी येथुन उडदाची पट्टी आणण्यासाठी बुलेटवरूण बार्शी येथे जाणा-या त्रिंबक रामा उमाप वय 59 रा.कळंबवाडी ता.बार्शी या सेवानिवृत्त शिक्षकाचा भावकीमधीलच दोघांनी अज्ञात कारणावरूण रस्त्यावर गाठुण दगडाने ठेचुन निर्घुण  खुन केला होता. हा प्रकार  उंबरगे-आगळगाव ता.बार्शी रस्त्यावर आगळगाव शिवारात घडला होता.खुन झाल्यावर दोघेही बार्शी तालुका पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाले होते. 
#संशयित दोघा बापलेकांना अटक करूण आज बार्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांनाही दि.31ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

#मयताचा मुलगा गणेश उमाप वय 23 रा.कळंबवाडी याने  बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

#संशयितांनी मयताची बुलेट रस्त्यावर आडवुन दगडाने मारहाण करूण त्यांचा खुन केला होता. दरम्यान खुनाचे कारण अद्याप अपस्षठच आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply