कळंबवाडी (पा) सरपंचपदी ज्योती भोसले

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
कळंबवाडी (पा) ता.बार्शी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ ज्योती शंकरराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शरद शिंदे यांनी काम पाहिले.यावेळी गाव कामगार तलाठी सचिन गोडगे , पोलीस पाटील डॉ.शंकरराव भोसले हे उपस्थित होते .
निवडीनंतर सत्कारास उत्तर देताना नूतन सरपंच यांनी गावाच्या नावलौकिकास साजेसा कारभार करून प्राधान्याने शेत रस्ते करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.यावेळी जेष्ठ नेते हणमंत जाधव,बाबुराव भोसले,नेताजी भोसले ,मनोज भोसले,माजी सरपंच संतोष जाधव, बप्पा जाधव,रामभाऊ जाधव,दत्तात्रय जाधव,ग्रा पं सदस्य प्रमोद गोसावी व भाग्यश्री देवी गोसावी ,कुबेर जाधव,दादा पौळ, राजाभाऊ भोसले,दादा जाधव ,दिनकर भोसले सोमा मोरे, संजय गुळवे किरण जाधव ,विनोद जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते
निवड झाल्याबद्दल बार्शीचे आ. राजेंद्र राऊत,माजी आमदार किसनराव देशमुख, वैभव पाटील,जि प सदस्य मदन दराडे, जि प सदस्य समाधान डोईफोडे, सभापती अनिल डिसले यांनी शुभेच्छा दिल्या.