March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कळंबवाडीच्या सेवानिवृत्त शिक्षकाचा अज्ञात कारणावरूण रस्त्यात अडवुन खुन, दोघांवर गुन्हा दाखल, आरोपी स्वतः पोलिसात हजर

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

कळंबवाडी येथुन उडदाची पट्टी आणण्यासाठी बुलेटवरूण बार्शी येथे जाणा-या एका सेवानिवृत्त शिक्षकाचा भावकीमधीलच दोघांनी अज्ञात कारणावरूण रस्त्यावर गाठुण दगडाने मारूण निर्घुण  खुन केल्याचा प्रकार उंबरगे-आगळगाव ता.बार्शी रस्त्यावर आगळगाव शिवारात आज गुरूवारी दि.22 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुमारास घडला.त्यामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

     #त्रिंबक रामा उमाप वय 59 रा.कळंबवाडी ता.बार्शी  असे खुन झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. खुन केल्याप्रकरणी भावकीतीलच दोघांवर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

##बिभिषण विश्वनाथ उमाप व विश्वनाथ बाबु  उमाप दोघेही रा.कळंबवाडी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बापलेकाची नावे आहेत.दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान खुनी  बार्शी पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला.

#मयताचा मुलगा गणेश उमाप वय 23 रा.कळंबवाडी याने याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की तो घरी जेवन करत असताना त्याला या प्रकाराची माहिती फोनवरून मिळाली.त्याने घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्याचे  वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेले होते व अंगावर बिभीषण विश्वनाथ उमाप बसलेला होता , त्यावेळी त्याच्या अंगावर रक्ताने माखलेला भगवा शर्ट व गळ्यात पांढरा गमज्या होता . तसेच त्याचे वडील विश्वनाथ बाबु उमाप हे पायावर बसलेले होते.

#संशयितांनी मयतास रस्त्यावर गाठुण व आडवुन मारहाण सुरू केल्यावर सोडवण्यासाठी जाणा-या लोकांवर संशयितांनी दगडफेक केली.तसेच जवळ येण्यास मज्जाव केला.जखमी अवस्थेत उमाप यांना पिक अप वाहनामधुन  बार्शी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान वैद्यकिय अधिका-यांनी ते मयत झाल्याचे सांगितले. 

@मयत उमाप हे एक वर्षापुर्वी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी करमाळा तालुक्यासह, सौंदरे, मांडेगाव येथे सेवा बजावली होती.त्रिंबक उमाप यांच्या पश्चात पत्नी, तिन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
याबाबत उमाप याने दिलेल्या फिर्यादीवरूण दोघांवर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

Leave a Reply