कनफेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन्स ऑफ इंडिया ची बैठक संपन्न..

बार्शी ;
कनफेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बार्शी येथे कोरोना संदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करत आणि सामाजिक अंतर ठेवून मोठ्या उत्साहात पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. सी. बी. गंभीर होते.
संघटित आणि असंघटित मजूर, कामगारांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तसेच श्रमिकांना संरक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आणि संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी चर्चासत्र व मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तज्ञांनी आपल्या अडचणी आणि आपली मते व्यक्त करत विविध क्षेत्रातील श्रमिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत, संघटनेच्या माध्यमातून अविरत कार्य करण्याचेही जाहीर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. इकबाल पठाण, जनरल सेक्रेटरी बी. आर. देशमुख, प्रकाश गव्हाणे, धिरज शेळके, आर. टी. माने, भीमा मस्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कांदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हेमंत मस्के यांनी मानले.