October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कत्तलखान्यात जाणा-या गायी बार्शीत पकडल्या

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

बेकायदेशीर पणे कत्तलखान्यात गायी घेऊन जाणारा पिक अप तिन जिवंत व एका मृत गायीसह पकडल्याचा प्रकार बार्शी -कुर्डुवाडी रस्त्यावरील एका काॅलेजजवळ घडला.

Advertisement

#इर्शाद नदाफ ,शाहीबाज कुरेशी,सहिच अली कुरेशी तिघेही रा.अकलुज ता.माळशिरस व जलील कुरेशी रा.उस्मानाबाद अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#धन्यकुमार राजमल पटवा वय- 57  रा. गवत गल्ली कुर्डुवाडी रोड, बार्शी ता. बार्शी या प्राणिमित्राने बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दि. 23/03/2021 रोजी रात्री 10/00 वा. चे सुमारास फिर्यादीस माहीती मिळाली की, एका बुलोरो पिकअप गाडीत गायी घेऊन येत आहे. त्यामुळे ते पोलीसांच्या मदतीने बार्शी शहरातील BIT कॉलेज पेट्रोलपंपाजवळ  थांबले असता  एक बुलोरो पिकअप गाडी नं. MH 45 T – 1950 या क्रमांकाचा येताना दिसला. त्यावेळी पोलीसांनी सदर टेम्पोस थांबण्याचा इशारा केला आसता तो न थांबता तसाच पुढे गेला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. सदर वाहनाची पाहणी केली आसता सदर वाहनास वरुन ताडपदरी व पाठीमागुन फळया व त्यावर ताडपदरी लावलेली होती. सदरच्या फळया व ताडपदरी काढुन आत पाहणी केली आसता, सदर पिकअपमध्ये 4जर्सी गायी दिसुन आल्या. त्यामधील 1 जर्सी गाय प्रवासादरम्यानं गुदमुरुन मयत झाल्याचे आढळुन आले. असे क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंबुन त्यांच्या मुसक्या आवळुन, दोरीने करकचटुन बांधुन त्यांना जखमा झाल्याचे दिसत होते. व वेदना होईल अशा स्थितीत कमी रुंदीच्या जागेत त्यांना हालचाल करता येनार नाही. तसेच सदर वाहनात जनावरांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नसताना, अशा पध्दीतीने वाहुन घेऊन जात आसताना मिळुन आला आहे. सदर पिकअपवरील चालकास त्याचे नाव विचारले आसता, इर्शाद कमाल नदाफ वय-27 वर्ष, रा. जुना बाजारतळ अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर असे असल्याचे सांगीतले. सदर पिकअपवरील क्लिनर शाहीबाज फारुक कुरेशी वय 17 वर्ष रा. होनमाने प्लट अकलुज ता. माळशिरस जि.सोलापुर तसेच त्यांना जनावरे वाहतुक परवाना व जनावरांच्या खरेदी पावती बाबत विचारणा केली आसता जनावरे वाहतुक परवाना व जनावरांच्या खरेदी पावत्या नसल्याचे सांगीतले. सदर पिकअपचे ड्रायव्हला सदरच्या गायी कोठुन घेवुन आला व कोठे घेवुन चालला आहे असे विचारले असता त्याने सदरच्या गायी सहिपअली कुरेशी अकलुज यांचेकडुन घेवुन आलो आहे व सदरच्या गायी उस्मानाबाद येथील जलील कुरेशी यांचे कत्तल खान्यामध्ये कत्तलीसाठी घेवुन चाललो आहे.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply