October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कत्तलखान्याकडे जाणारा पिकअप पोलीसांनी पकडला


बार्शी;
कत्तलखान्याकडे विनापरवाना जनावरे घेऊन जाणारा पिकअप बार्शी तालुका पोलिसांनी पकडल्याचा प्रकार बार्शी कुर्डवाडी बाह्यवळण रस्त्यावर दूध डेअरी समोर घडला.

Advertisement

#कलीम रफीक कुरेशी व अफताब अकबर कुरेशी  दोघे.रा.पापनस ता.माढा जि.सोलापूर  अशी याप्रकरणात कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#धनराज  फत्तेपुरे वय 30 यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की पहाटेच्या सुमारास प्राणीमित्र धन्यकुमार  पटवा रा.बार्शी यांनी पोलीस ठाणेस येवून कळविले की , कुर्डूवाडी ते बार्शी जाणारे रोडने बोलोरो पिकअप गाडीमधून कत्तलीसाठी गाईची वाहतूक केली जाणार आहे.
  पोलीस जामगांव ( आ ) गावचे हदीत वारणा डेअरी समोर जावून थांबले. वाहने चेक करीत असताना एक पांढरे रंगाची बोलरो पिकअप गाडी  आली असता सदर पिकअप गाडी ही पोलीस उपनिरीक्षक युवराज सुर्यवंशी यांनी थांबवून सदर वाहनाचे चालकास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव कलीम रफीक कुरेशी वय वर्षे रा.पापनस ता . माढा जि.सोलापूर असे असल्याचे सांगीतले व त्याचे सोबत असणारे इसमास त्याचे नाव विचारता अफताब अकबर कुरेशी वय वर्षे रा.पापनस ता.माढा असे असल्याचे सांगीतले.सदर बोलरो पिकअप वाहनाची  पोलीस स्टाफने पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त गाई या दाटीवाटीने भरुन त्यांना वेदना होईल अशा स्थितीत कमी रुंदीच्या जागेत त्यांना हालचाल करता येणार नाही व जनावरांच्या मुसक्या आवळूल आतून बांधले होते.सदर पिकअपमध्ये जनावरांच्या चारा पाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नसताना अशा पध्दतीने दाटीवाटीने गाई भरलेली दिसली तसेच पिकअप चालक कलीम कुरेशी यास जनावरे वाहतूक करण्याचा परवाना तसेच गाई कोठे घेवून निघाला आहे ? अशी विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगीतले . गाईचे मालक कोण याबाबत विचारणा केली असता सदरच्या गाई या कलीम रफीक कुरेशी याने त्याचे मालकीच्या असल्याचे सांगीतले.तसेच सदरची गाई कोठे घेवून चालला आहे याबाबत विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे दिली नाही.यावरुन आमची खात्री झाली की , सदरची जनावरे ही उस्मानाबाद येथील कत्तलखान्याकडेच घेवून निघालेले आहेत.
  पोलिसांनी 3 लाखाचे पिक अप व 1 लाख 75 हजाराची जनावरे जप्त केली. त्याचेविरुध्द प्राप्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलमासह प्राप्यांचे परिवहन कलम,महाराष्ट्र पशुसंरक्षण कलम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply