March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल प्रदेश अध्यक्षपदी अजिंक्य गोवेकर

पुणे : राज्यातील पत्रकारांत सर्व परिचित असलेल्या आणि आपल्या दमदार कामगिरीने प्रभावी संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल च्या प्रदेशाध्यक्ष पदी कराड येथील पत्रकार अजिंक्य गोवेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेच्या केंद्रीय समितीच्या वतीने एक वर्षासाठी करण्यात आली आहे.
या निवडी संदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर म्हणाले की , राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासाठी  लढा ऊभा करण्याचा प्रयत्न करणार असून पत्रकार पेंशन योजनेचा प्रश्न मार्गी लागावा ,या साठी प्रयत्न करणार आहे. या साठी राज्यातील पत्रकार मित्रांना एकत्र आणणार ,असे ही श्री.गोवेकर म्हणाले.

Leave a Reply