October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत एस टी विभागातील अधिकारी, कर्मचारी याची मोफत आरोग्य तपासणी

बार्शी ;
बार्शी येथील एस टी विभागातील अधिकारी, व कर्मचारी यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन लायन्स क्लब बार्शी राँयल या  संस्थेच्या वतीने करण्यात आले होते या शिबीरात डाँ निनाद दोशी (अस्थिरोग तज्ञ) डाँ स्नेहल दोशी ( डायबेटीस व हदयरोग तज्ञ ) याच्या मार्गदर्शनाखाली  एस टी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बी पी,शुगर इ,सी,जी आँक्सिजन लेव्हल,दमा सांधेवात,मणक्याचे आजार इत्यादी आरोग्य तपासणी मोफत करण्यात आल्या या आरोग्य तपासणी शिबीराचा एकूण १२० अधिकारी, कर्मचारी यानी लाभ घेतला या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन लायन्स क्लबचे अध्यक्ष सौ सिमा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबीरासाठी सचिव सुजाता मुथा,खजिनदार  सौ दोशी ,शशिकांत बारबोले,सचिन दोशी ,अमर काळे यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply