October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

एल आय सी च्या या योजनेतून मिळवा बक्कळ फायदा…वाचा

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसी ( LIC ) कडे बर्‍याच पॉलिसी आहेत, ज्यात कमी बचत करून मोठा निधी मिळू शकतो. परंतु आज आपण ज्या योजनेबद्दल सांगणार आहोत ती एलआयसीची सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला दरमहा सुमारे 2500 रुपये मासिक हप्ता जमा केल्यावर 22,500 रुपयांचा बोनस मिळतो.तसेच पॉलिसीचा कालावधी संपुष्टात आल्यावर तुम्हाला सुमारे 5 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळते. या पॉलिसीचे तपशील काय आहेत ते जाणून घेऊया. (Lic Policy Know How Jeevan Anand Policy Give 22500 Every Year)

Advertisement

जीवन आनंद पॉलिसी असे LIC च्या या योजनेचे नाव

जीवन आनंद पॉलिसी असे LIC च्या या योजनेचे नाव आहे.

ही आजच्या काळातील एलआयसीची सर्वात लोकप्रिय पॉलिसी आहे. कारण यामध्ये तुम्हाला दरवर्षी निश्चित रक्कम मिळते, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी मिळते.

दरवर्षी असे 22,500 रुपये मिळवा

या पॉलिसीअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याला 5 लाख रुपयांच्या विम्यावर दरमहा 2500 रुपये अधिक जीएसटी जमा करावा लागेल. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दरवर्षी 22,500 रुपयांचा बोनस मिळणे सुरू होते. ही रक्कम संपूर्ण 20 वर्षे उपलब्ध राहील. तसेच ती व्याजासह मिळते. याशिवाय 10,000 रुपयांचा अतिरिक्त बोनसही उपलब्ध आहे.

शेवटी तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील

बोनस व्यतिरिक्त पॉलिसी मॅच्युरिटीवर तुम्हाला पाच लाखांची रक्कम मिळेल. जर आपण 2500 रुपयांच्या मासिक हप्त्यापासून सुरुवात केली असेल आणि आपण 22,500 रुपये बोनसचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंतच्या संपूर्ण पॉलिसीवर अतिरिक्त बोनस म्हणून साडेचार लाख रुपयांचा बोनस आणि 10 हजार रुपये घेतले आहेत. तर शेवटी तुम्हाला उर्वरित 5 लाख रुपये मिळतील. ही 5 लाखांची रक्कम आहे, ज्यासाठी आपण पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली होती. मॅच्युरिटीनंतर 5 लाख रुपये मिळणार आहेतच, त्या व्यतिरिक्त तुम्ही 4.60 लाखांचा बोनसही घेतलाय. आपण एलआयसीच्या वेबसाईटवर किंवा एलआयसीच्या कोणत्याही एजंटकडून या पॉलिसीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

काय आहेत पॉलिसीची वैशिष्ट्ये?

>> एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्ष आणि त्याहून अधिक असली पाहिजे.
>> या योजनेमध्ये 25 वर्षांच्या कालावधीत परतावा मिळतो.
>> या पॉलिसीनुसार संबंधित व्यक्तीला किमान 1 लाख रुपये मिळण्याची हमी आहे. तर कमाल रक्कमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.
>> या पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विमा असे दोन्ही फायदे मिळतात.
>> जीवन आनंद पॉलिसीसाठी 15 ते 35 वर्ष मुदत ठरवण्यात आली आहे.

Leave a Reply