October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

एन एम के 1 गोल्डन सीताफळाच्या जाती संदर्भात कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी घेतली बैठक

बार्शी ;

एनऐमके 1 गोल्डन या पेटंट प्राप्त सीताफळ वानाची देशातील व राज्यातील शेतकऱ्यांची वाढती मागणी सोबतच वाढलेल्या अवैध्य सीताफळ नर्स-यांची वाढती संख्या त्यामुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान व पेटंट चे उल्लंघन पाहून या संदर्भाने या वानाचे जनक डॉ.नवनाथ मल्हारी कसपटे यांच्यासह कृषी सचिव एकनाथ डवले,कृषी आयुक्त धिरज कुमार,कृषी फलोत्पादन सहसचीव अशोक आत्राम,फलोत्पादन संचालक शिरीष जमदाडे,कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी, राहूरी.कृ.वि संशोधन संचालक ऐस.आर.गडाख व क्षीकांत कुलकर्णी,वाळूंज,सीताफळात संशोधन केंद्र अबेजोगाईचे डाॅ.गोविद मुंडे, पं.दे.कृ.विद्यापीठ अकोले प्रतिनिधी गोविंद जाधव,विकास पाटील ,प्रविण कसपटे
यांच्या सोबत मंत्रालय मुंबई येथे हि बैठक पार पडली या वेळी डाॅ.नवनाथ कसपटे यांनी विकसित केलेल्या एन.एम.के 1 गोल्डन या वाणाचे कृषी मंत्री दादाजी भुसे व ईतर सर्व ऊपस्थीता कडून कौतुक करण्यात आले .तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या.

Leave a Reply