March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

एजेएफसीच्या प्रदेशाध्यक्ष पदी दिपक नागरे,संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी केली निवडीची घोषणा

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज


  ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (AJFC) या पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणा-या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकार दीपक  नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ह्या निवडीची घोषणा ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल यांनी नुकतीच केली.
   व्यवसायाने शिक्षक असलेले दीपक सत्यभान नागरे हे गत 25-30 वर्षांपासून ग्रामीण भाग ते जिल्हास्तरीय पत्रकारिता संघटन क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या नियुक्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारीता संघटनांच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.नागरे यांचे निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply