October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ऋतुजा मुंबरे हिचे तलवार बाजीत स्पर्धेत यश

सोलापूर;

मळेगाव ता.बार्शी येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे स्थायिक असलेल्या राजकुमार मुंबरे यांची कन्या ऋतुजा मुंबरे हिने नांदेड येथे महाराष्ट्र फिनिक्स असोसिएशन व फिनिक्स असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेत सायबर प्रकारचे गोल्ड मेडल मिळवून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच ज्योती माळी,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, माजी सरपंच सिद्धेश्वर मुंबरे,संतोष निंबाळकर,उपसरपंच धीरज वाघ,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,ग्रा.प.सदस्य,समाधान पाडुळे,मंडळाचे यशवंत गाडे,महाराष्ट्र राज्य धनगर समाज तालुका अध्यक्ष सागर शेळके आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply