March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ऊस बीलासाठी जयहिंद साखर कारखाण्याच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन…

सोलापूर ;
थकीत ऊस बीलासाठी वारंवार शांततेत निवेदने देऊन सुध्दा शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्यामुळे आज शुक्रवारी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सोलापूर येथील जय हिंद साखर कारखाण्याच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले,यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्यांनासुध्दा कोरोना पासून मरायचे नाही परंतु वारंवार शांततेत निवेदने देऊन सुध्दा व कायद्याने चौदा दिवसांत एफ आर पी एक रकमी देणे बंधनकारक असतानाही कारखानदार पैसे देत नसल्यामुळे नाविलाजाने कोरोनाच्या नियमांचे पालन करत शांततेत आज हे बोंबाबोंब आंदोलन केले आहे परंतु सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांची देणी लवकरच न दिल्यास सोलापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय व संबंधित कारखान्यावर कोरोनाच्या नियमांचे पालन करत पंचेवीस मार्च पासुन आंदोलने करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले, त्यावेळी बालाजी गडदे, विजय थिटे, समाधान थिटे, बलभिम आरेकर, लक्ष्मण वाघचवरे, गणेश झेंडगे, ब्रम्हदेव वाघचवरे, युवराज गायकवाड, रामदास झेंडगे, रामदास थिटे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply