ऊस तोड मजुराचा चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यु

बार्शी ;- महाराष्ट्र स्पीड न्युज
शेतात ऊसतोडणी सुरू असताना अचानक चक्कर येऊन पडल्यामुळे ऊसतोड करणा-या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार घारी ता.बार्शी शिवारात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
#दत्ता भानुदास लगड वय २८ रा.जांभरून ता.जि. वाशीम सध्या ऊसतोडणी निमित्त घारी शिवार ता.बार्शी असे त्या दुर्देवी मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मयताचे साडू किसन विठ्ठल भालेराव रा. नागठाणा ता.जि. वाशीम यांनी सदर घटनेची खबर पांगरी पोलिसात दिली असून त्यात म्हटले आहे की मी व मयत दत्ता लगड व इतर ऊसतोड मजूर आम्ही सर्वजण मिळून सकाळी साडेसहा वाजताचे सुमारास घारी येथील शेतकरी दिनकर जगदाळे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना थोड्या वेळाने मयत दत्ता लगड यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले लागलीच माझ्यासह इतर सहकारी ऊसतोड मजुरांनी त्यांना पांगरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद घेण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग मुंढे करीत आहेत.