June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ऊसाचा रस पिताय..वाचा हि बातमी….

पुणे – रस्त्याच्या कडेने येता-जाता अनेकदा तुम्हाला उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज रस पिण्यासाठी खेचून नेतो. त्यामुळे तुम्ही आनंदाने ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असता. मात्र, काही लोकांना उसाच्या रसातील हा गोडवा फारसा आवडत नसल्यामुळे ते रस पित नाही.

दरम्यान, आज आम्ही तुम्हाला याच उसाच्या रसाचे आपल्या शरीराला होणारे चांगले फायदे सांगणार आहोत. नक्कीच हे फायदे वाचून तुम्ही आज पासूनच उसाच्या रसाचे सेवन करण्यास सुरुवात कराल.

हे आहेत उसाच्या रसाचे फायदे :

ऊसाच्या रसात पोषक घटक असतात. त्याव्यतिरिक्त यात कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घटक असतात. तसेच ऊसात एंटी कॅन्सरचे गुण असतात.

आणि हेच गुण कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून रोखतात.

ऊसाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनच्या समस्या दूर होते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. ऊसाच्या रसात आम्लीय क्षमता असते. ज्यामुळे जर मुतखडा झाला असेल तर मुत्रावाटे हा खडा बाहेर निघतो. अश्या व्यक्तींनी रोज उसाच्या रसाचे सेवन करायला हवे.

अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. काहीवेळा एनीमिया सुद्धा असतो. या परिस्थितीत लाल पेशी कमी होत असतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरत असतो.

जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर हाडांना मजबूती देण्यासाठी तसंच उर्जा देण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन करणं कधीपण चांगले ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

उसाच्या रसाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे, तुमच्या दातांचा इन्फेक्शनपासून बचाव करते आणि त्यांना निरोगी व चमकदार ठेवण्यास मद होते. म्हणून उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात महत्व देण्यात आले आहे.

Leave a Reply