February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उस्मानाबाद जिल्ह्यातील कारीत घरफोडी ; दोन लाखांहून अधिक ऐवज लंपास

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

कारी ता.जि.उस्मानाबाद येथे एकाच रात्रीत दोन घरे फोडुन सोन्याचे दागिने,रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट असा दोन लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार आज दि.17 बुधवारी सकाळी उघडकीस आला.

# शिवाजी ज्योतीराम माने वय-65 वर्षे, रा-कारी, ता- जि.उस्मानाबाद यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की
दि. 16/03/2021 रोजी रात्रौ 9/00 वा. चे सुमारास सर्वजण जेवणखाण करून ते शेतात ज्वारी काढणेचे काम चालु असल्याने ते शेतात झोपणे करिता गेले तर दोन सुना व त्यांची पत्नी  असे किचनचे खोलीला
बाहेरून कुलुप लावुन शेजारचे खोली मध्ये झोपले होते.दि 17/03/2021 रोजी सकाळी 06/00 वाजता सुन उठली
व  घरासमोरील अंगण झाडत असताना तिला किचनचा दरवाजा उघडा असलेला दिसला. त्यानी सदर खोली मध्ये जवुन पाहिले असता किचन रूम मध्ये ठेवलेले गोदरेजचे कपाट उघडे असलेले दिसले व त्यातिल सामान व कपडे खोली मध्ये आस्थाव्यस्त पडलेले होते.
फिर्यादीने घरी येवुन पाहिले असता गोदरेजचे कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे
दागिने व रोख रक्कम 4,000 रू.हे मी ठेवलेले ठिकाणी मिळुण आले नाही.तसेच  घरातील कपडे व इतर कागदपत्रे
घराचे पाठीमागे शेता मध्ये पडलेले दिसले.त्यानंतर  खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरटयाने आमचे कपाटातील
सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे. तसेच आमचे शेजारी राहणारे सतिश अभिमुन्य सारंग रा कारी ता जि
उस्मानाबाद यांचे दोन मोबाईल पण चोरीस गेले आहेत.

चोरट्यांनी 52,500 रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे दोन फुलेझुबे जोड ,24,500 रुपयांच्या 7 ग्रॅम वजनाच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या जु.वा.कि.अं.
451001, 87,500 रुपयांचे एक अडीच तोळे वजनाचे साखळीतील गंठन ,17,500 रु अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मण्याचे गंठन , 4,000 रू रोख रक्कम व 10,000 रू दोन मोबाईल असा ऐवज बंद घराचे कुलुप कडी कोयंडा व तोडुन आत प्रवेश करुन  घरातील 1,86,000 रू.चे व आमचे शेजारीराहणारे ,सतिश अभिमुन्य सारंग यांचे बाहेरील दोन मोबाईल किंमत 10,000/- रु किंमतीचे असे सर्व मिळुन
1,96,000 /- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे कोणीतरी अज्ञात चोरट्यानी  संमती वाचुन
मुद्दाम लबाडीने चोरुन नेले आहे. अज्ञात चोरट्याविरुध्द पांगरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply