June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उस्मानाबाद जिल्हा विविध गुन्हे वृत्त,बुधवार, दि.24/03/2021

“11 गुन्ह्यात 13 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा.”

पोलीस ठाणे, भुम: रविंद्र सोपान घुले यांनी मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भुम यांनी 200 ₹ दंडाची शिक्षा 24 मार्च रोजी सुनावली आहे.

Advertisement

पोलीस ठाणे, कळंब: प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 24 मार्च रोजी खालील 3 गुन्ह्यांतील 5 आरोपींना दंडात्मक शिक्षा सुनावल्या. यात जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्ररकणी 2 गुन्ह्यातील 4 आरोपींना प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा तर मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): विनायक चांगदेव देशमुख, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी कोविड- 19 संबंधी रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन 20.00 वा. पानटपरी व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 500 ₹ दंडाची शिक्षा 24 मार्च रोजी सुनावली आहे.

पोलीस ठाणे, शिराढोन: विजयसिंह वैजनाथ गुमाने, रा. शिराढोन यांना जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्ररकणी 300 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

पोलीस ठाणे, आंबी: मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 200₹ व बेदरकापणे, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

पोलीस ठाणे, तामलवाडी: बेदरकापणे, निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल एका व्यक्तीस 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

पोलीस ठाणे, परंडा: मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल अनिल पवार व आण्णासाहेब इंगळे यांना प्रत्येकी 200₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 24 मार्च रोजी सुनावली आहे.

“मोटार वाहन कायदा अंतर्गत 355 कारवाया- 77,400 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”

उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणी, शहर वाहतूक शाखा यांनी 23 मार्च रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत 355 कारवाया करुन 77,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

“अवैध मद्य विरोधी कारवाई.”

पोलीस ठाणे, मुरुम: भुसणी तांडा, ता. उमरगा येथील फुलचंद मुन्ना चव्हाण हे 23 मार्च रोजी आपल्या राहत्या घरालगत 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 520 ₹) विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद अवैध मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या 7 व्यक्तींवर गुन्हे दाखल.”

उस्मानाबाद जिल्हा: मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन किंवा बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून किंवा वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283, 285, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 7 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 7 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 23 मार्च रोजी दाखल केले.

(1) आकाश बेले, रा. तडवळा यांनी तुळजापूर- उस्मानाबाद रस्त्यावर तर दत्तात्रय जगताप, रा. हंगरगा यांनी विश्वनाथ कॉर्नर येथे ऑटोरीक्षा रहदारीस धोका- अडथळा होईल अशा प्रकारे उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) परंडा, येथील फकीर पठाण यांनी ऑटोरीक्षा, अनिल पवार यांनी टाटा व्हिस्टा कार तर आण्णासाहेब इंगळे यांनी महिंद्रा पिकअप ही वाहने परंडा शहरातील 3 विविध ठिकाणी रहदारीस धोका- अडथळा होईल अशा प्रकारे उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) उस्मानाबाद येथील श्रीकांत पवार यांनी उस्मानाबाद येथील बेंबळी रस्त्यावर हातगाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उललंघन केले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) इम्रान आळंदकर यांनी लोहारा येथील सार्वजनिक रस्त्यावर ऑटोरीक्षा बेदरकारपणे, निष्काळजीपणे चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

“अवैध सावकारी: एकावर गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे, बेंबळी: गणेश संभाजी माळी, रा. पाटोदा, ता. उस्मानाबाद यांनी गावकरी- तानाजी राजगुरु यांच्याकडून सन- 2004 मध्ये 27,000 ₹ कर्ज घेतले होते. त्या कर्ज- व्याजापोटी राजगुरु यांनी माळी यांची 10 आर शेतजमीन विकत घेतल्याचे सहकार अधिकारी- सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी माळी यांच्या तक्रार अर्जावरील चौकशीत निष्पन्न झाले आहे. अशा मजकुराच्या सहकार अधिकारी- बालाजी सावतर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा कलम- 39 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“चोरी.”

पोलीस ठाणे, लोहारा: भारतबाई देविदास राठोड, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा यांच्या राहत्या घराचे कुलूप गावकरी- राहुल लालु राठोड यांनी 22 मार्च रोजी 18.00 वा. सु. तोडून घरातील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने व 60,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या भारतबाई राठोड यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदेवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: यशवंतनगर, सांजा येथील तानाजी लक्ष्मण पवार यांची टीव्हीएस ज्युपीटर स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 7430 ही 19- 20 मार्च दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तानाजी पवार यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: संजय लक्ष्मण पवार, रा. सिरसाव, ता. परंडा हे कुटूंबीयांसह 22 मार्च रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले होते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने 23 मार्च रोजी 02.00 ते 04.00 वा. चे दरम्यान घरातील 18 ग्रॅम सोन्याचे दागिने, साड्या- 11 नग व 11,100 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजय पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: नालंदा डिकोजी पाटील, रा. हागलुर, ता. तुळजापूर हे 23 मार्च रोजी 12.30 वा. सु. नळदुर्ग येथील एका केश कर्तनालयात केश कर्तन करत असतांना त्यांनी बाजूस टेबलवर ठेवलेली 10,000 ₹ रक्कम असलेली त्यांची बॅग अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नालंदा पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: इंदीरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील भाग्यश्री गोपीनाथ रणे या 12 मार्च रोजी 09.30 वा. सु. घराचा दरवाजा उघडा ठेउन दुकानात गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञाताने आतील कपाटावर ठेवलेली 15,000 ₹ रक्कम, 1.5 ग्रॅम सोन्याचे- चांदीचे दागिने व पॅनकार्ड असेली पर्स चोरुन नेली. अशा मजकुराच्या भाग्यश्री रणे यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“लैंगीक अत्याचार.”

उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील एका पुरुषाने गावातीलच एका 50 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) विवाहाचे आमिष दाखवून गेल्या 15 वर्षांपासून तीच्याशी लैंगीक संबंध ठेवले. त्या महिलेने विवाहाचा आग्रह धरला असता त्याने तीला जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरुन पिडीत महिलेने 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नेांदवला आहे.

“अपहरण.”

उस्मानाबाद जिल्हा: विदर्भातून उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस तोडीस आलेल्या मजुराच्या 15 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) 22 मार्च रोजी 19.00 वा. सु. एका तरुणाने फुस लावून अपहरण केले. तर दुसऱ्या घटनेत जिल्ह्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 18 मार्च रोजी 10.30 वा. सु. घरा बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा घरी परतली नाही. यावरुन तीचे कोणी अज्ञाताने अज्ञात कारणांसाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या दोन्ही अपहृत मुलींच्या पित्यांनी 23 मार्च रोजी संबंधीत पो.ठा. येथे दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“अपघात.”

पोलीस ठाणे, तुळजापूर: चालक- समाधान श्रीकांत शिराळ, ता. बार्शी यांनी 20 मार्च रोजी 15.00 वा. सु. काक्रंबा पर्यायी मार्गावर कार क्र. एम.एच. 13 बीएन 6522 ही निष्काळजीपणे चालवून वैभव संजय कळसे, वय 25 वर्षे व नरेश बसलिंग अनंतवार, दोघे रा. हानेगाव, देगलुर, जि. नांदेड हे प्रवास करत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात वैभव कळसे हे मयत झाले तर नरेश अनंतवार हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विजय सायलु धडगे, रा. हानेगाव यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“मारहाण.”

पोलीस ठाणे, परंडा: भांडगाव, ता. परंडा येथील संतोष व विनोद भास्कर भानवसे हे दोघे बंधु 22 मार्च रोजी 19.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- तुकाराम पांडुरंग कोळेकर यांनी भानवसे बंधुंना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष भानवसे यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Reply