June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उस्मानाबाद जिल्हा विविध गुन्हे वृत्त

शुक्रवार, दि.26/03/2021

                                                                             “कोविड- 19 काळात आगामी सण- उत्सवांच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचे पथ संचलन .”

उस्मानाबाद जिल्हा: 28 मार्च रोजी होळी, 29 मार्च रोजी धुलिवंदन तर 2 एप्रील रोजी रंगपंचमी हे सण- उत्सव आहेत. परंतु कोविड- 19 रोगाच्या साथीमुळे शासन- प्रशासनाने विविध मनाई आदेश जाहिर केले आहेत. त्यानुसार जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था रहावी, कोविड- 19 संबंधी जारी असलेल्या मनाई आदेशांचे पालन व्हावे या उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या गावांत पोलीस प्रशासनातर्फे पथ संचलन करण्यात येउन ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. (सोबत पथ संचलनाची छायाचित्रे जोडली आहेत.)

Advertisement

“निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्या दोघांना आर्थिक दंडाची शिक्षा.”

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): श्रीकांत गणपत कुंभार व शहादुला मेहताब थोडगे, दोघे रा. उस्मानाबाद या दोघांनी उस्मानाबाद शहरात सार्वजनिक रस्त्यावरील आपापल्या हातगाड्यात मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी 300 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 1 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 25 मार्च रोजी सुनावली आहे.

“मोटार वाहन कायदा अंतर्गत 222 कारवाया- 51,100 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”

उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणी, शहर वाहतूक शाखा यांनी 25 मार्च रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत 222 कारवाया करुन 51,100 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

“जुगार विरोधी कारवाई.”

पोलीस ठाणे, वाशी: वाशी येथील रविंद्र पोपटराव देवकर हे 24 मार्च रोजी पिंपळवाडी रस्त्यालगतच्या मनोऱ्याजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 480 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नेांदवला आहे.

“जुगार विरोधी कारवाई.”

पोलीस ठाणे, ढोकी: जुगार चालू असल्याच्या खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पथकाने 25 मार्च रोजी तेर येथे 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात तेर येथील आकाश प्रकाश सोनवणे व राजेंद्र बाबासाहेब बंडगर हे दोघे अनुक्रमे बसस्थानकजवळ व गावातील हनुमान मंदीर चौकात एकत्रीत- कल्याण मटका जुगार साहित्य चालवण्याचे साहित्य व 610 ₹ रक्कम बाळगलेले पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद दोघांविरुध्द म.जु.का. अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

“अवैध मद्य विरोधी कारवाई.”

पोलीस ठाणे, मुरुम: बापुराव शामराव गायकवाड, रा. चिंचोली (भु.), ता. उमरगा हे 25 मार्च रोजी आपल्या शेतात अवैध गावठी मद्य निर्मीतीचा 25 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 650 ₹) बाळगलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी गावठी मद्य निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”

उस्मानाबाद जिल्हा: मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन किंवा निष्काळजीपणे माल वाहतूक करुन किंवा कोविड- 19 चे मनाई आदेश झुगारुन हॉटेल व्यवसायास चालू ठेवून भा.दं.सं. कलम- 283, 285, 188, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 9 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 4 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 24- 25 मार्च रोजी दाखल केले.

(1) राम धोंडीबा बनसोडे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद यांनी मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 आर 5615 मध्ये ऊस भरून सकनेवाडी शिवारातील रस्त्यावर वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) ईट, ता. वाशी येथील 1)निशाद दिलशाद काझी 2)बाळासाहेब चंद्रकांत हुंबे यांनी ईट येथे 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ताब्यातील हातगाड्यांवर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उललंघन केले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर लोकसेवकाने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन येरमाळा येथील 1)रियाज बशीर शेख 2)अमर जाफर शेख 3)अब्बास मौला शेख 4)भगवान रामभाउ बांगर 5)पांडुरंग शिवाजी मुंढे 6)सोमनाथ विठ्ठल नरसाळे या सर्वांनी रात्री 08.50 वा. सु. येरमाळा, दुधाळवाडी व रत्नापुर फाटा येथील आपापल्या ताब्यातील हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून व्यवसाय केला.

“अपहरण.”

उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 13 मार्च रोजी 18.00 वा. सु. शिकवणीला जाते असे कुटूंबीयांना सांगुन घराबाहेर गेली. ती घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता गावातीलच एका युवकाने फुस लावून तीचे अपहरण केल्याचे समजले. अशा मजकुराच्या अपहृत मुलींच्या पित्याने 25 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

“चोरी.”

पोलीस ठाणे, आनंदनगर: बार्शी नाका, उस्मानाबाद येथील ‘उमाशंकर लेडीज कलेक्शन’ दुकानात 24 मार्च रोजी 13.30 वा. सु. 5 अनोळखी व्यक्ती कपडे खरेदीस आल्या होत्या. दरम्यान दुकानातील ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेउन त्यांनी दुकानातील साड्या- 9 नग व ड्रेस- 9 नग असा 20,680 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दुकान मालक- अनिता नागेश बामणे यांनी 25 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सुनिल गैबिराज अनपट, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांच्या घराचे कुलूप 25 मार्च रोजीच्या रात्री 3 अनोळखी पुरुषांनी तोडून घरात प्रवेश केला आणि सुनिल अनपट यांना लाकडी फळीने मारहाण करुन जखमी केले. तसेच चाकु, लोखंडी टामीचा धाक दाखवून घरातील 50 ग्रॅम सुवर्ण दागिणे, 27,500 ₹ रक्कम व गल्लीतील ट्रक क्र. एम.एच. 25 एजे 0179 च्या इंधन टाकीतील 100 लि. डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुनिल अनपट यांनी दिलेल्या प्रथम खबरेरुन भा.दं.सं. कलम- 458, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: सतीश व्यंकट खटके, रा. बोरी, ता. उमरगा हे 25 मार्च रोजी 12.30 वा. सु. उमरगा बसस्थानकात उमरगा- लातुर बसमध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या पिशवीतील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या सतीश खटके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“अपघात.”

पोलीस ठाणे, तामलवाडी: बलभिम नागनाथ घोडके, रा. मुस्ती, ता. सोलापूर (द.) व श्रीकांत शामराव जाधव, रा. काशेगाव, ता. सोलापूर (द.) हे दोघे दि. 11.02.2021 रोजी 21.00 वा. सु. माळुंब्रा- मसला असा मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान मसला शिवारातील रस्त्यावर अज्ञात चालकाने मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून बलभिम घोडके चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बलभिम घोडके हे मयत होउन श्रीकांत जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- महानंदा घोडके यांनी 25 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“मारहाण.”

पोलीस ठाणे, आनंदनगर: उस्मानाबाद एमआयडीसी समोरील उड्डान पुलाखाली 23 मार्च रोजी 16.30 वा. सु. भांडण सुरु होते. यावेळी रफिक सलीम शेख, रा. उस्मानाबाद हे ते भांडण सोडवण्यास गेले असता तेथील 1)निखील राठोड, उस्मानाबाद 2)देवा राठोड, रा. जहागीरदारवाडी 3)सचिन (पुर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी रफिक शेख यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रफिक शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: सुशीला राजेंद्र उंबरे, रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद या 25 मार्च रोजी वाणेवाडी गट क्र. 216 मधील आपल्या शेतात पिकाची काढणी करत होत्या. यावेळी शेतजमीनीच्या पुर्वीच्या वादावरुन गावकरी- विष्णु सुर्यभान शिराळ व अविनाश शिराळ यांनी सुशीला उंबरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळ्याने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत सुशीला यांच्या हातास विळ्याचा मार लागून गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या सुशीला उंबरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): वरुडा, ता. उस्मानाबाद येथील लहु सदाशिव मगर यांसह पाच कुटूंबीय व प्रकाश वसंत मगर यांसह तीघे कुटूंबीय अशा दोन्ही गटांचा 24 मार्च रोजी 07.00 वा. सु. शेत जमीन मोजणीच्या कारणावरुन वाद उद्भवला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वीटांनी, लोखंडी पाईप, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लहु मगर व प्रकाश मगर यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

Leave a Reply