June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उसतोड कामगार नडला; दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी चतुर्भुज

अहमदनगर , 17 मार्च 2021:-औरंगाबाद जिल्ह्यातील एका ऊस तोड कामगाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना नेवासा पोलीस ठाण्याचा कर्मचारी याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सोमनाथ अशोक कुंढारे (वय ३३) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे नातेवाईक मोटर अपघातात मयत झाले होते.

त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. सदर मयत व्यक्तीच्याबाबतचे पीएम रिपोर्ट आणि पंचनाम्याची प्रत मिळावी, यासाठी पोलीस कर्मचारी कुंढारे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडी अंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि लाचेची रक्कम दिनांक १७/०३/२०२१ रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे स्वीकारली.

यावेळी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचखोर पोलीस कर्मचारी सोमनाथ अशोक कुंढारे याला रंगेहाथ पकडले आहे.

Leave a Reply