October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उपळाई (ठोंगे) येथे जुगार अड्डयावर छापा

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

उपळाई (ठोंगे) ता.बार्शी येथे  बेकायदेशीर पणे जुगार खेळणा-या सात जुगा-यांवर बार्शी तालुका पोलीसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.

#रोहीत बाशींगे वय 30 वर्षे रा कसबा पेठ संकेश्वर उदयान बार्शी, मुकेश भोरे वय 32 वर्षे रा कसबा पेठ, रमेश विश्वनाथ पवार वय 38 वर्षे रा सुभाष नगर बार्शी, महेश चंद्रकांत पवार वय 28 वर्षे रा एकविराई चौक बार्शी, लक्ष्मण खंडू वाघ वय 52 वर्षे रा मंगळवार पेठ बार्शी, तकबिर हीदायत पठाण वय 53 वर्षे रा आमन चौकाचे पाठीमागे बार्शी , अमोल विलास गुरव रा.बारगुळे प्लट बार्शी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

बार्शी तालुका पोलीस खाजगी वाहनाने खांडवी बिट हाददीत पेट्रोलिंग करत असताना  सपोनि शिवाजी जायपत्रे यांनी कळविले की, उपळाई ठोंगे हद्दीतील कॅनलचे कडेला गव्हाणे फर्मचे पश्चिमेस 1 की मी आंतरावर शेतात लींबाचे झाडाखाली कांही इसम जुगार खेळत आहेत अशी बातमी मिळाली आहे असे कळविले.
  पोलिसांनी छापा टाकला असता काही इसम गोलाकार बसुन पैशाची पैज लावुन पत्त्याचे सहायाने जुगार खेळत असल्याचे दिसले.सदर ठिकाणी बसलेल्या इसमांना सदर ठिकाणी काय करत आहे याबाबत विचारणा केली असता लक्ष्मण वाघ याने ते सदर ठिकाणी मन्ना नावाचा जुगार पत्याचे सहायाने खेळत असलेचे सांगुन सदर जुगार अडडा महेश चंद्रकांत पवार व लक्ष्मण खंडु वाघ असे दोघेजण चालवत असलेचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही कोणाची परवानगी न घेता अगर कोणास न विचारता या लींबाचे झाडाखाली जुगार खेळत असल्याचे सांगीतले.
जुगार खेळताना त्यांचेकडे  रोख रक्कम,मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 41,680/-रु. किमतीचा मुददेमाल मिळुन आला.त्यांच्या विरोधात  मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply