October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उद्या उजनीच्या पाण्यासह विविध मागण्यांसाठी पाथरीत रस्ता रोको

बार्शी : महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

पाथरीच्या धरणामध्ये उजनीच्या कॕनॉलचे पाणी सोडा, राहिलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा, अतिवृष्टी व मागील दुष्काळ निधी आदींसह विविध मागण्यांसाठी १७ फेब्रुवारीला रस्ता रोको करण्याचे पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी ठरवून त्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांची पाथरीत सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, सरकार कोणाचेही आले तरी जोपर्यंत शेतकरी संघटीत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची खरी भाषा कोणताच पक्ष बोलणार नाही. सगळ्याच राजकारण्यांनी शेती विरोधी धोरणे राबवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वरचेवर वाढू लागल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लढाईसाठी सज्ज व्हावे असे सांगून १७ फेब्रुवारीच्या आंदोलनात सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी गायकवाड केले. यावेळी पंचक्रोशितील शेतकऱ्यांच्या वतीने पाथरी गावचे सरपंच मा. नेताजी गायकवाड यांच्या हस्ते शंकर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
   त्यावेळी माजी सरपंच नानासाहेब गायकवाड, ब्रम्हचारी गायकवाड, शिराळेचे माजी सरपंच समाधान पाटील, दयानंद चौधरी, अरविंद चौधरी, श्रीकृष्ण पाटील, राजेंद्र फरताडे, भाऊसाहेब पाटील, रविंद्र चोरमले, गुणवंत गायकवाड, रामहरी गायकवाड, विनोद गायकवाड,  आदींसह पंचक्रोशितील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गायकवाड यांनी केले…..

Leave a Reply