October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उद्यापासून बॅका या वेळेत सुरू राहणार

मुंबई: आज पासून बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज एक नोव्हेंबर बँकांना रविवारची सुट्टी असल्याने उद्यापासून हे सर्व नियम बँकांना लागू होणार आहेत. यामध्ये बँकांच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या ईज (EASE) अन्वये बँकिंगमधील सुधारणांतर्गत ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखांच्या वर्गीकरणानुसार कामकाजाची वेळ एकसमान केली आहे. उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे.

इंडियन बँक असोशिएशनने ग्राहकांसाठी देशामधील राष्ट्रीयकृत बँक शाखांच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. वर्गवारीनुसार सकाळी नऊ ते दुपारी तीन, सकाळी दहा ते सायंकाळी पाच आणि अकरा ते संध्याकाळी पाच अशा तीन वेळांत बँका सुरू राहणार आहेत.त्याची अंमलबजावणी आता सुरू केली जाणार आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समितीने आयबीएचा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांसाठी कामकाज वेळा निश्चित केल्या आहेत.

रहिवासी क्षेत्रातील बँकांची सकाळी नऊ ते दुपारी चार अशी असली तरी ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन अशी वेळ असेल. व्यापारी क्षेत्रातील बँकांची सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा अशी वेळ असून ग्राहकांसाठी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत अशी ठेवण्यात आली आहे. इतर व कार्यालयासाठी असलेल्या बँकांची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच असून ग्राहकांसाठी सकाळी दहा ते पाच अशी राहणार आहे. जिल्हा तसेच शाखानिहाय बँकेच्या वेळेचा तपशील बँक ऑफ महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक शाखेने त्यांच्या कामकाजाच्या वेळा सूचना फलकांवर लिहून ते ग्राहकांना समजतील अशा ठिकाणी ठेवायचे आहेत. शुक्रवारपासून नवीन वेळा लागू होत असून ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Reply