March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उद्याचा उष्यकाल हा श्रमिकांच्या संघर्षामध्ये दडलेला आहे – कॉम्रेड प्रा तानाजी ठोंबरे

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

आयटक चा सुवर्ण शताब्दी महोत्सव बार्शी येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी भगवंत मैदान येथील कार्यालयावर साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेला बापू सुरवसे व संतोष मोहिते  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  यावेळी मंचावर कॉम्रेड तानाजी ठोंबरे उपस्थित होते.

Advertisement

यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर म्हणाले, “आयटक या केंद्रीय कामगार संघटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, हा आनंदाचा क्षण आहे.  संघर्षाचा, त्यागाचा साम्राज्यवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्याचा, स्वातंत्र्य संग्रामाचा त्यासोबतच श्रमिकांच्या अस्मितेचे विषय पुढे घेऊन जात कामगार कायदे यांची मोडतोड थांबणाऱ्या दैदिप्यमान इतिहासाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.  लाला लजपत राय, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, कॉम्रेड एस. ए. डांगे, इंद्रजीत गुप्ता, ए.बी. बर्धन, गुरुदास दासगुप्ता असे मातब्बर नेते या संघटनेचे अध्यक्ष व महासचिव राहिले आहेत.  हा क्रांतिकारी श्रमिकांचा इतिहास पुढे घेऊन जात असताना आजच्या परिस्थितीमध्ये धर्मांध व भांडवली शक्ती ह्या श्रमिकांचे कायदे मोडून कामगार जगत नेस्तनाबूत करत आहेत, या विरोधात अत्यंत कडवा संघर्ष करण्याची गरज निर्माण झाली आहे.  उद्याचा उष्यकाल हा श्रमिकांच्या संघर्षामध्ये दडलेला आहे, श्रमिकांचा लाल सूर्य हा नक्कीच उगवेल असा आत्मविश्वास यानिमित्ताने वाटतो आहे” असे ते म्हणाले.

याच कार्यक्रमात आयटकचे महासचिव  गुरुदास दासगुप्ता  व  जगदाळे मामा हॉस्पिटल मधील तारा तांबे  यांना आयटक कमिटीकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयटक ला संलग्न असणाऱ्या  संघटनांचे  कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे रशिद इनामदार, बापू सुरवसे, पांडूरंग यादव, घरेलू कामगार संघटनेचे शौकत शेख, मुमताज शेख, बांधकाम कामगार संघटनेचे  अनिरुद्ध नकाते, शाफीन शेख, संतोष मोहिते, प्रेम मोहिते, नवनाथ मोहिते, सागर पवार,आनंद धोत्रे, मुजफ्फर शेख, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रवीण मस्तुद, परमेश्वर पवार, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे भारत भोसले, किसन मुळे, धनाजी पवार हे उपस्थित होते.  यावेळी ऑल इंडिया बँकर्स असोसिएशनच्या सरिता कुलकर्णी, ऋषिकेश सूर्यवंशी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे पवन आहिरे, सारंग पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply