उत्कृष्ट कामगिरीत पांगरी पोलीस ठाणे जिल्ह्यात द्वितीय, सपोनी सुधीर तोरडमल यांचा झाला सन्मान

सोलापूर;- महाराष्ट्र स्पीड न्युज
मनोजकुमार लोहिया विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांची कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत सोलापूर ग्रामीण येथील वार्षिक तपासणी सुरू आहे.सदर वार्षिक तपासणी अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण येथे सोलापूर जिल्ह्यातील एकूण 25 पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीचा/कामगिरीचा आढावा घेण्यात आला.सदर कार्यपद्धती/कामगिरी मध्ये उत्कृष्ट कामगिरी असलेले पोलीस स्टेशन यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पांगरी ता.बार्शी पोलीस स्टेशन,पांगरी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पांगरी पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर तोरडमल यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.
सदर कामगिरीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी बार्शी उपविभाग बार्शी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस अधिकारी सपोनि सुधीर तोरडमल ,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट , सर्व बीट अंमलदार व बीट मदतनीस,कार्यालयीन कामकाज करणारे सर्व पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पांगरी पोलीस स्टेशन पांगरी यांना हा सन्मान मिळाला आहे.