इनरव्हिल क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिर,सामाजिक जबाबदारी जोपासत केले रक्त संकलन

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
इनरव्हिल क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून इनरव्हिल क्लब बार्शी ने सामाजिक भान ठेवून तीन ठिकाणी रक्तदानाचे आयोजन केले होते.
आर.के.क्लब, इंडस्ट्रीयल इस्टेट नं.२ व रामभाई शहा रक्त पेढी येथे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदविला.
यासाठी अजित कुंकुलोळ, गौतम कांकरीया व गणेश प्लॅस्टो पॅक कर्मचारी व स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सौ. कुसूम राठोड होत्या. रक्तदान शिबीरासाठी इनरव्हिल अध्यक्षा सौ. हेमा कांकरीया, गुंजन जैन, स्मिता कांकरीया, शिल्पा सरवदे, कुसूम राठोड आदि उपस्थित होत्या,
Maharashtra SPEED News,SPEED news#Maharashtra update#Maharashtra news#Maharashtra live update#Maharashtra corona#Maharashtra news#corona update#News update#Live news#Live update#latest update,Maharashtra Update,