March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

इनरव्हिल कल्बच्या वतीने बार्शीतील भटक्या विमुक्तांची दिवाळी केली गोड

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी येथील इनरव्हिल कल्बच्या वतीने शहरातील  भटक्या विमुक्त लोकांची दिवाळी गोड करण्यात आली . क्लबच्या वतीने  दिवाळीच्या  पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्त लोकासाठी साडी, लहान मुलांसाठी कपडे,पुरूषांना कपडे, पणती, उबटन, तेल, लाडू, फराळ, चॉकलेट आदी आवश्यक साहित्य वाटप केले.
  बार्शी शहरातील जवळ असल्यालेल्या जामगांव रोड वर  भटक्या लोकांची वस्ती आहे. लाॅकडाऊन पासून या लोकांना कसल्याचं प्रकार चा रोजगार उपलब्ध होत नसल्याने जीवन अधीक बिकट झाले आहे.
  त्यांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून इनरव्हिल कल्बच्या वतीने मदतीचा हात पुढे करूण मुलाचे कपडे, साडी, शर्ट, पॅन्ट, फराळ, पणती, उबटन, तेल, चकलेट्स यांचं वाटप करण्यात आले  कार्यक्रम साठी अध्यक्षा हेमा कांकरिया, सचिव गुंजन जैन, सदस्या प्रिया सुराणा, स्मिता कांकरिया, भारती पल्लोड, स्नेहल लोढा उपस्थित होत्या

Leave a Reply