October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आर्थिक पेक्षा शारीरिक संपत्ती सर्वात मोठी ; आ.राजेंद्र राऊत

बार्शी;-

बाजार समितीमधील सर्वांनीच या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या शरीराची काळजी घ्यावी.आर्थिक संपत्तीपेक्षा शारिरीक संपत्ती सर्वात मोठी आहे असे प्रतिपादन आ.राजेंद्र राऊत यांनी केले.ते बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या  व्हाॅलीबाॅल मैदान व ओपन जिमच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले होते.
व्यासपीठावर नगराध्यक्ष असिफ तांबोळी,रमेश पाटील,
कौरव माने,रावसाहेब मनगिरे,विजय राऊत,चेअरमन रणवीर राऊत, अनिल पाटील बाबा मोरे,सचिन मडके,कुंडलिक गायकवाड,राहुल मुंढे, दिलिप गांधी, दामोदर काळदाते आदी उपस्थित होते.

Advertisement

आ.राऊत पुढे बोलताना म्हणाले की अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी बार्शी महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती आहे.बाजार समितीचे जे घटक आहेत त्यांच्या शारिरीक व्यायामाची गरज ओळखून ही व्यवस्था करण्यात आली आहे.थकल्यावर शिनवटा जाणे गरजेचे आहे.गटारी ,रस्ते झाले,जनावरांचा बाजार लवकरच लातुर रस्त्यावरील जागेत नेणार आहे.ग्रामीण भागातील शेतक-याच्या मुलाची राहण्याची, जेवनाची व्यवस्था लवकरच केली जाईल.12 कोटी शेज उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.बाजार समितीचे दोन कोल्ड स्टोअरेज लवकरच उपलब्ध होतील.

  @नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनीही बाजार समितीने हे चांगले काम केले असुन याचा आदर्श ईतर बाजार समित्या घेतला पाहिजे असे सांगितले.

विश्वास बारबोले बोलताना म्हणाले की बाजार समितीत सतत नवनवीन विकास कामे बघावयास मिळते.प्रत्येकाने आपल्या शरिरासाठी वेळ देणे गरजेचे आहे.

यावेळी बसवराज घायगुंडे  व उमेश देशमाने यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply