June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आमदार प्रणिती शिंदे यांनी रामवाडी येथील बोगद्यामध्ये साचणारया पाण्याचा निचरा होण्यासाठी मा. आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारयासोबत केली पाहणी

सोलापूर : सोलापूर शहरामध्ये वादळी पावसाच्या पाण्यामुळे रामवाडी सरकारी गोडाऊन जवळील मोदी बोगदा येथे खुप मोठया प्रमाणात पाणी साचते यामुळे सेटलमेंट, रामवाडी, इरण्णा वस्ती व भोवतालच्या परिसरातील ये-जा करणारे नागरीक, वाहतुक व तसेच मोदी स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी जाण्याकरीता खुप मोठा अडथळा निर्माण होतो. याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. पी. शिवशंकर, सिटी इंजिनिअर श्री. लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री. संजय धनशेट्टी, झोन अधिकारी श्री. लोखडे व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत व्हिजीट घेतली.

मा. आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, सेटलमेंट, रामवाडी, इरण्णा वस्ती व भोवतालच्या परिसरातील ये-जा करणारया नागरीकांना व मोदी स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी जाण्याकरीता पर्यायी रस्त्याची सोय मुरुम टाकून, डांबरीकरण व दिवाबत्तीची सोय करून 15 दिवसांमध्ये व्यवस्था करण्याचे आश्वासन मा. आयुक्त यांनी दिले.

यावेळी नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेविका वेष्णवी करगुळे, बाबा करगुळे, नागनाथ कासलोलकर, गोपाळ नंदूरकर, भारत जाधव, संजय गायकवाड, यल्लप्पा तुपदोळकर, अनिल मस्के, वसंत पवार, सुरज गायकवाड व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply