October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आनंद काशिद यांच्या कडुण राज्य शासनाचा धिक्कार…

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या सकल मराठा समाजाच्या, दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई आक्रोश मोर्चा वर सरकारने बंदी घालून, पंढरपूर शहरात आज रात्री बारापासून संचारबंदी लागू केली असून, पंढरपूरकडे जाणारी सर्व एसटी वाहतूक. सरकारने दोन दिवस बंद ठेवली आहे. सरकारच्या या कृतीचा सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा व शहर च्या वतीने आनंद काशिद यांच्या वतीने  तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
  काशिद यांनी शासनाचा धिक्कार व्यक्त केला. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार आपल्या न्याय व हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना. सरकार ज्याप्रकारे दडपशाही करत आहे. हे लोकशाहीला व स्वतंत्र भारताला शोभणारे नाही. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेमध्ये मराठा समाज सोडून सगळ्या समाजाला आरक्षण आहे. पण संघर्षाचा आमचा वारसा असून हे आंदोलन आरक्षण जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत असेच चालू राहिल. सरकारने आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य दाखवून. या आंदोलनावर ज्याप्रकारे बंदी घातली आहे. ही बाब अतिशय निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामधील छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे असून, आत्तापर्यंत आंदोलन आम्ही शांततेतच केले असून, यापुढे मात्र सरकार जर अशी वागणूक देणार असेल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असेही काशिद यांचे मत आहे.

Leave a Reply