October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आदीवासी मध्ये आत्मीयता यावी यामुळे कलेक्टर चक्क चड्डी बनियनवर

नक्षलग्रस्त छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात आदिवासी नागरिकांत आपल्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी नवनियुक्त जिल्हाधिकारी रजत बन्सल यांनी आगळा फंडा अमलात आणला आहे. बन्सल स्वतः हाफ पॅण्ट आणि बनियान असा वेश परिधान करून आदिवासींच्या भेटीगाठी घेत आहेत. जिल्हाधिकारी हे आपल्यातीलच एक आहेत असा विश्वास आदिवासींत निर्माण करण्याचा बन्सल यांचा फंडा कमालीचा यशस्वी होत आहे. जंगलात फिरताना गाडय़ा, सुरक्षारक्षक असा काफिला न घेता बन्सल सायकलवरून अथवा पायी जंगलातील गावांना भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. गावात ते आदिवासींसोबतच जेवण घेतात आणि रात्रीचा मुक्काम करतात. त्यामुळे आदिवासी त्यांना देवदूतच मानू लागले आहेत.

Leave a Reply