आदर्श गाव मळेगावच्या सरपंच पदी ज्योती माळी तर उपसरपंचपदी धीरज वाघ

बार्शी;
मळेगाव ता.बार्शीच्या सरपंच पदी ज्योती संजयकुमार माळी व उपसरपंच पदी धीरज रमेश वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.
गेल्या 45 वर्षांपासून हे गाव बिनविरोध ग्रामपंचायत होणारे गाव म्हणून राज्यात नावाजलेले गाव अशी ओळख परंतु ह्या पंचवार्षिक निवडणुकीत गावातील जेष्ठ मंडळींनी गाव बिनविरोध करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले,व 45 वर्षाची परंपरा खंडित होऊन ग्रामपंचायत निवडणूक लागली.बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून केलेले रक्तदान शिबीर,ग्राम स्वच्छता अभियान,एक गाव एक गणपती,जि.प.शाळेला केलेली मद्दत,गरजू व्यक्तीला केलेली आर्थिक मदत, कोरोनाच्या काळात कायमस्वरूपी सुरू करण्यात आलेल्या नर्मदेश्वर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून निराधार लोकांसाठी दोन वेळचे जेवण,गावच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम,सुकन्या योजनेच्या माध्यमातून दिलेली मद्दत गावाला दिलेली निवडणुकीत आश्वासने, आशा अनेक सामाजिक कामाच्या जोरावर गावकऱ्यांनी श्री नर्मदेश्वर नागनाथ महाराज ग्राम विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी केले.
यावेळी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, राजकुमार मुंबरे माजी उपसरपंच भाऊसाहेब म्हमाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
गावचे ग्रामदैवत नागनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये सत्कर कार्यक्रमात सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यात आले,या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी,माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गंगूताई माळी, अध्यक्ष अंकुश माळी,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,उपाध्यक्ष नितीन पवार,माजी सरपंच संतोष निंबाळकर,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,भाऊ पाडुळे,प्रगतशील बागायतदार दिगंबर भराडे,राजाभाऊ फपाळ,श्रीमंत पाडुळे,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,समाधान पाडुळे,आदम बागवान,मारुती देवकते,आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अकबर शेख यांनी मानले.