June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आज दसरा,अशी ओळखा आपट्याची पाने व फसवणूक टाळा

  • -दसरा म्हणटलं की झेंडूची फुलं, आंब्याच्या पानांचे तोरण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपट्याची पाने. दसऱ्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा पूर्वापारपासून चालत आलेली आहे. त्याबाबतचे संदर्भ रामायण-महाभारतातही दिले जातात.

आपट्याच्या वृक्षाची संख्या कमी होत चालल्याने आपट्याच्या पानासारखीच दिसणारी कांचन वृक्षाची पाने बाजारात आपटा म्हणून विक्रीला आणली जातात. ही खरी फसवणूक तर आहेच परंतु झाडाची अति प्रमाणात तोड देखील आहे.

आता तुम्ही म्हणालं तोड कशी काय? तर आपट्याची झाडांची संख्या खुप कमी होत चालली आहे. आणि आपटा आणि कांचन वृक्षाच्या पानांमध्ये साम्य आढळून येत असल्याने आपटा म्हणूनच कांचनची पाने सोने म्हणून वाटली जातात.

कांचनची पाने मोठी हिरवेगार आणि शिराकमी असणारी असतात तर आपट्याची पाने खडबडीत लहान आणि शिरादाट असणारी असतात. आपट्याच्या झाडापेक्षा कांचनची झाडे जास्त आहेत.

त्यामुळे आपट्याच्या पानांची कमतरता भासू नये म्हणून गेल्या दोन दिवसांत विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर कांचनची पाने विकली आहेत. कांचनची पाने कोवळी असतात. त्यावर बारीक लव असते. ही पाने जसजशी मोठी होतात तशी ही लव नाहीशी होते.

शहरालगतच्या टेकड्यांवरील, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या आपट्याच्या झाडांची संख्या कमी झाल्याने विक्रेत्यांनी आपट्याच्या हुबेहुब पान असणाऱ्या कांचन या झाडाच्या पाने विकली जातात. त्यामुळे ही झाडेही धोक्यात आली आहेत. आपट्याच्या झाडांची संख्या कमी असल्याने या पानांऐवजी झेंडूची फुले वाटावी, असे आवाहन पर्यावरण प्रेमींमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply