सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
हन्नूर येथील मोतीराम रामचंद्र शहा वय 70 यांनी सततच्या पोट दुःखीच्या आजारास कंटाळुन हरणा नदीपात्रात आत्महत्या केली. ते शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बाहेर गेले होते. ते परत घरी परत आलेच नाहीत.
प्राथमिक माहिती अशी मिळते की मोतीराम शहा यांनी आपल्या आजाराला कंटाळून मित्रांमध्ये बसल्यावर मी आत्ता कुठेतरी जाऊन जीव देणार आहे असे गप्पा मारताना सांगत होते असे त्यांचे मित्राचे म्हणणे आहे.
त्यांना दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे मोठा मुलगा दयानंद शहा यांनी वडील घरी आले नाहीत म्हणून गावात शोधा-शोध सुरू केली. पण कुठेही मिळायला तयार नाहीत. अखेर जवळच्या असलेल्या नदी पात्राजवळ जाऊन बघितले तर थोड्या प्रमाणात संशय यायला सुरू झाला. तरी रात्री अकरा वाजेपर्यंत नदीमध्ये बघितले तर कुठेही दिसले नाहीत.
शनिवारी पहाटे पुलावरून बघितले असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना दिसला व त्यांना बाहेर काढून शासकीय नियमानुसार त्यांची अंत्यसंस्कार करण्यात आला. घरचे असेच किती दिवस मला दवाखान्याला दाखवणार म्हणून त्यांनी पूर्ण जीवणाचाच त्याग केला असे यावरून कळून येते.