October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आजपासून पेटिएम वर पेमेंट करणे महागल! मोजावे लागतील अतिरिक्त पैसै

नवी दिल्ली – हल्ली अनेक जण वीज बील भरण्यापासून ते गॅस सिलेंडर बूक करण्यापर्यंत आणि मोबाईल-डीटीएच रिचार्ज करण्यापासून ते ऑनलाईन खरेदीपर्यंत पेटीएम व्हॉलेटचा (Paytm Wallet) सर्रास वापर करताना दिसतात. मात्र, आता अशा लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण पेटीएमचा वापर करणे आजपासून (15 ऑक्टोबर) महागले आहे.

Advertisement

क्रेडिट कार्डने पैसे लोड करण्यासाठी लागणार 2 टक्के चार्ज –
क्रेडिट कार्डने पेटीएम व्हॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त चार्ज द्यावा लागत नव्हता. मात्र, आता कंपनीने आपल्या नियमांत बदल केला आहे. paytmbank.com/ratesCharges वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर 2020पासून एखाद्या व्यक्तीने आपल्या क्रेडिट कार्डने पेटीएम व्हॉलेटमध्ये पैसे अॅड केले, तर त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज (शुल्क) द्यावा लागणार आहे.

यात जीएसटीचाही समावेश असेल.

Paytm बँकेत FD वर मिळेल 7 टक्के व्याज, तर 13 महिन्यांचा मॅच्युरिटी पीरियड

उदाहरण देऊन सांगायचे, तर क्रेडिटकार्डच्या सहाय्याने पेटीएम व्हॉलेटमध्ये 100 रुपये अॅड करायचे असतील तर, आपल्याला क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. यापूर्वी हा नियम 9 ऑक्टोबरपासूनच लागू होणार होता. सध्या, क्रेडिट कार्डने पेटीएममध्ये पैसे लोड केल्यास कंपनी 1 टक्का कॅशबॅक देत आहे.

मर्चन्ट्स साईट्सवर पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त चार्ज नाही –
या व्यतिरिक्त, कुठल्याही मर्चन्ट्स साईट्सवर पेटीएमने पेमेंट करण्यासाठी कसल्याही प्रकारचा अतिरिक्त चार्ज लागणार नाही. पेटीएमने व्हॉलेटमध्ये ट्रांसफर करण्यासाठीही कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही. तसेच, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगनेही पेटीएम वॉलेटमध्ये पेसे अॅड करण्यासाठी कसल्याही प्रकारचा अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही.

1 जानेवारी 2020रोजीही कंपनीने केला होता नियमात बदल –
यापूर्वी 1 जानेवारी 2020 रोजीही कंपनीने नियमांत बदल केला होता. आतापर्यंत एखादा युझरने एका महिन्यात क्रेडीट कार्डने पेटिएम व्हॉलेटमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत पैसे अॅड केले, तर त्याला अतिरिक्त चार्ज द्यावा लागत नव्हता. मात्र, 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे अॅड केले तर त्याला 2 टक्के चार्ज द्यावा लागत होता. आता 15 ऑक्टोबरपासून क्रेडिटने कितीही पैसे पेटीएम व्हॉलेटमध्ये अॅड केले, तरी युझरला 2 टक्के चार्ज द्यावा लागणार आहे.

Leave a Reply